सकल ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम भवन जागेची पाहणी

0
18

 

सकल ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीनुसार नगर शहरामध्ये भगवान परशुराम भवनउभारण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेच्या माध्यमातून बंधन लॉन परिसरामध्ये जागा उपलब्ध करून दिली असून त्या जागेची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. यावेळी माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, सकल ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पोतदार डॉ. श्रीकृष्ण जोशी, दिनकर देशमुख, नंदकुमार पोळ, मोरेश्वर मुळे, बंडुपंत विप्रदास, अरुण औटी, चेतन वसगडेकर, एन. डी कुलकर्णी, मंगेश निसळ, सुरेश क्षिरसागर, प्रकाश कुलकर्णी, नरेंद्र श्रोत्री, विजय देशपांडे, दि. ना जोशी, विलास बडवे, रत्नाकर कुलकर्णी, श्रीधर बापट, सूर्यकांत आगरकर, अजित चाबुकस्वार, मयूर जोशी, अनिल जोशी, मकरंद देशपांडे, विवेक पंडित, श्रीगोपाल जोशी,शिवप्रसाद पुंडे, गोविंद कुलकर्णी, सुमित तांबोळी, प्रदीप घायाळ, सुधीर रणभोर, केदार बडवे, शिरीष देशपांडे. रविंद्र बडवे, राजेश भालेराव, योगेश दाणी, हेमंत लोहगावकर, उमेश भालेराव, रविंद्र कुलकर्णी, अनिरुद्ध मऊरकर, अभिजित बल्लाळ, दिनकर देशमुख, प्रमोद कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, नगर शहरांमध्ये भगवान परशुराम यांचे भव्य दिव्य असे भवन उभारले जाणार आहे. त्या माध्यमातून धार्मिकतेचे विचार आत्मसात केले जातील सर्व समाज एकत्रित येऊन वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करत राहतील. आजच्या तरुण पिढीला धार्मिकतेच्या विचाराची खरी गरज आहे आपण सर्वजण मिळून भगवान परशुराम यांचे विचार पुढे घेऊन जाऊ, असे ते म्हणाले. राजाभाऊ पोतदार म्हणाले की, ब्राह्मण समाजाचा अनेक वर्षांचा जागेचा प्रलंबित प्रश्न आ. संग्राम जगताप यांनी मार्गी लावला आहे, त्यामुळे या ठिकाणी भव्य दिव्य असे भगवान परशुराम भवन उभे राहणार आहे, तसेच समाजाचे विविध कार्यक्रम देखील साजरे करता येणार आहे, त्या माध्यमातून समाज एकवटला जाईल व त्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण करता येईल व समाजाचे प्रश्न मार्गी लागले जातील. आ. संग्राम जगताप हे ब्राह्मण समाजातील विविध प्रश्न मार्गी लावत असल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे असे ते म्हणाले.