बॅचलर ऑफ आर्किटेक्चर प्रथम वर्षाच्या नाटा पूर्व परीक्षेत कौन्सिलने केलेला आमूलाग्र बदल

0
18

कौन्सिल ऑफ आर्किटेचरने (COA) २३ डिसेंबर २०२३ च्या पत्रकानुसार बॅचलर ऑफ आर्किटेचर प्रथम वर्ष प्रवेश परीक्षेसंबंधी आमूलाग्र बदल केलेले आहेत. नाटाच्या परीक्षेकरता विद्यार्थ्यांची नोंदणी १ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होणार आहे. या वर्षांपासून हि परीक्षा एप्रिल २०२४ ते जुलै २०२४ च्या महिन्यांमध्ये, दर शनिवारी व रविवारी सकाळ व दुपार या दोन सत्रांमध्ये होणार आहे. परीक्षेचे पहिले सेशन ६ एप्रिल २०२४ पासून सुरु होणार आहे. या परीक्षांचे गुण आर्किटेचरच्या प्रथम वर्ष प्रवेशाकरिता दोन वर्ष वैध असतील. विद्यार्थ्यांच्या सोयीकरता विद्यार्थ्यांना ही परीक्षा एका वर्षातून तीन वेळा देता येईल. या परीक्षेतील जे गुण प्रवेशाकरता पात्र (शश्रळसळलश्रश) असतील त्यानुसार त्यांना प्रथम वर्षाला प्रवेश घेता येईल. महत्त्वाचा बदल म्हणजे ही परीक्षा ५०% ऑफलाईन व ५०% ऑनलाईन या पद्धतीने घेण्यात येईल. ऑफलाईन परीक्षा ही ड्रॉइंग व कॉम्पोझिशन या विषयांकरता व ऑनलाइन परीक्षा ही मल्टिपल चॉइस असून, अ‍ॅपटिट्यूड  व डिझाईन सेंसिबिलिटी या विषयांकरता होईल. जे विद्यार्थी १० + १ (PCM Group) या विषयांसहित उत्तीर्ण / अपियर, किंवा जे विद्यार्थी १० + २ (PCM Group) विषयांसहित किंवा १० + ३ गणित विषयासहित उत्तीर्ण / अपियर असतील ते या विद्यार्थी या प्रवेश परीक्षेला बसण्यास पात्र असतील. महत्त्वाचे म्हणजे जे विद्यार्थी १० + २ (PCM Group) घेऊन ५०% गुणासहित उत्तीर्ण असतील किंवा जे १० + ३ गणित विषयासह उत्तीर्ण असतील तेच पुढे प्रथम वर्षाकरिता पात्र ठरतील. रमेश फिरोदिया एज्युकेशन ट्रस्टचे C.A. रमेश फिरोदिया व ट्रस्टचे विश्वस्त डॉटर शरद कोलते यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की वरील झालेले सगळे बदल विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे, त्याप्रमाणे आर्किटेचरच्या परीक्षेला बसण्याची विद्यार्थ्यांनी तयारी करावी आणि या संधीचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांनी करून घ्यावा. बॅचलर ऑफ आर्किटेचर प्रवेशा संदर्भात अधिक माहितीसाठी प्रा. मनोज कापरे ९५१८३३८२०२ यांच्याशी संपर्क साधावा