श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या कार्याने समाजात जागृती झाली

0
22

तळवण तेली समाजाच्यावतीने संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शोभा यात्रा काढण्यात आली होती. याप्रसंगी तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष प्रसाद शिंदे, उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर, सचिव शोभना धारक, खजिनदार प्रकाश सैंदर, विश्वस्त सागर काळे, गोकूळ कोटकर, दत्तात्रय डोळसे, शशिकांत देवकर, निता लोखंडे आदिंसह समाज बांधव.

श्री संत संताजी जगनाडे महाराज यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्यातून समाजात प्रबोधन होऊन समाज सजग झाला. त्यांचे विचार आजही आपणासर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. तिळवण तेली समजाच्यावतीने जयंती-पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमातून त्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहचण्याचे काम केले जात आहे. सप्ताहानिमित्त गेल्या सात दिवसांपासून विविध धार्मिक व सामाजिक कार्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यास समाज बांधवांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. समाजातील प्रत्येक घटकांच्या उन्नत्तीसाठी ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे, असे प्रतिपादन तिळवण तेली समाज ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी केले.

तिळवण तेली समाजाच्यावतीने संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शोभा यात्रा काढण्यात आली होती. याप्रसंगी प्रसाद शिंदे, उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर, सचिव शोभना धारक, खजिनदार प्रकाश सैंदर, विश्वस्त सागर काळे, गोकूळ कोटकर, दत्तात्रय डोळसे, शशिकांत देवकर, निता लोखंडे, हभप रामदास महाराज क्षीरसागर, ज्येष्ठ नागरिक विजय दळवी, कृष्णकांत साळूंके, किसन क्षीरसागर, बाबुराव लोखंडे, सुरेश देवकर, देवीदास साळूंके, वसंतराव काळे, भगवान नागले, सुभाष म्हस्के, गणेश धारक, योगेश भगवत, वैभव शिंदे आदि उपस्थित होते. याप्रसंगी हभप रमादास महाराज क्षीरसागर यांनी हा देह नश्वर आहे, त्यामुळे आपणाकडे जे आहे, त्यात समाधान राहून, भगवंतांचे नामस्मरण केले पाहिजे. संतांनी मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची केले. त्यांचे विचार आपण आचरणात आणून आपले जीवन समृद्ध करावे. संत जगनाडे महाराजांची निस्सीम भक्ती आपल्या जीवनाला दिशा देणारी आहे असे सांगून उपस्थितांना भक्तीमार्ग सांगितला. सप्ताहाच्या सांगता निमित्त काढण्यात आलेली शोभायात्रा दाळमंडई येथील मंदिरापासून सुरु होऊन तेलीखुंट, नवीपेठ, अर्बन बँक चौक, भिंगारवाला चौक कापड बाजार मार्गे पुन्हा मंदिरात आली. या शोभायात्रात विविध संतांची वेशभुषा केलेले मुले सहभागी झाली होती. तसेच भजन मंडळाच्या भगिनींनी पारंपारिक वेशभुषेत भजने गात होती. दुपारी मंदिरात हभप रामदास महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने आरती करुन महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी उत्सव समितीचे ओंकार लोखंडे, संतोष घोडके, विक्रम शिंदे, अमोल शिंदे, गणेश दहितुले, संदिप भागवत, संतोष शेंदूरकर आदिंसह युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, समाज बांधव उपस्थित होते.