अमृत पाणी योजनेमुळे नगर शहराचा पाणी प्रश्न सुटला : आ. संग्राम जगताप

0
54

अमृत पाणी योजनेचा ३० डिसेंबर रोजी वसंत टेकडी येथे लोकार्पण सोहळा

नगर – केंद्र व राज्य सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून अमृत पाणी योजनेचे काम मार्गी लागले असून या कामाचा लोकार्पण सोहळा ३० डिसेंबर रोजी वसंत टेकडी येथे खा.डॉ. सुजय विखे पाटील व आ.संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून, कार्यक्रम स्थळाची नियोजना संदर्भात पाहणी केली आहे. यावेळी आ. संग्राम जगताप म्हणाले की, मुळा धरण येथून १९७२ सालामध्ये नगर शहराला पाणी पुरवठा करणारी पहिली योजना झाली आहे. त्यानंतर शहराचे विस्तारीकरण व नागरी वसाहती झपाट्याने वाढत असल्यामुळे नगरकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते, पण आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मुळा धरण ते विळद घाट आणि विळद घाट ते वसंत टेकडीपयरत अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून, वसंत टेकडी येथील ५० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत पाणी पडले आहे.

फेज टू योजनेअंतर्गत शहरामध्ये विविध भागात पाण्याच्या टाया उभारल्या असून, त्यामध्ये अमृत पाणी योजनेचे पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे नगरकरांना पूर्ण दाबाने आणि वेळेवर पाणी पुरवठा होणार आहे. अनेक वर्षाचा शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागत असल्याचा आनंद होत आहे, असे ते म्हणाले. यावेळी जल अभियंता परिमल निकम, माजी नगरसेवक निखिल वारे, इंजि. गणेश गाडळकर, साहेबान जहागिरदार, इंजि. शिंदे, वैभव वाघ, सागर गोरे आदी उपस्थित होते.