नगररचना विभागाच्या भ्रष्ट कारभाराचे नगरसेवकांनी काढले महासभेत वाभाडे

0
50

रस्ते, लाईट, अतिक्रमणाच्या विषयावर नगरसेवक आक्रमक

 

नगर – महापालिकेचा नगररचना विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा झाला असून, येथील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या भ्रष्टाचाराला सर्वसामान्य नागरिकांसह काही नगरसेवकही बळी पडल्याचा आरोप करत नगरसेवक संपत बारस्कर आणि कुमारसिंह वाकळे यांनी महापालिकेच्या महासभेत नगररचना विभागाच्या कारभाराचे चांगलेच वाभाडे काढले. नगररचना विभागातील भ्रष्टाचारावरून भविष्यात नगरमध्ये मोठा उद्रेक होईल असा इशाराही त्यांनी दिला. महापालिकेची बहुधा शेवटची ठरणारी महासभा बुधवारी (दि. २०) महापौर सौ. रोहिणीताई शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. सभेच्या सुरुवातीलाच ही महासभा शेवटची न ठरवता ३१ डिसेंबरपयरत आणखी एक महासभा घेऊन शहरातील विकासकामे मार्गी लावावेत, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यानंतर आयुे पंकज जावळे सभेला उपस्थित नसल्याने विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर, कुमार वाकळे, सागर बोरुडे यांनी सभा थांबवण्याची मागणी केली. सत्ताधारी नगरसेवक म्हणतात आयुे येत आहेत. त्यांच्याकडे शिष्टमंडळ आहे. आपण सभा सुरू करू. आयुे अखेर हजर झाले व गोंधळ थांबला. त्यानंतर सभा सुरू झाली. नगररचना विभागात घराच्या पूर्णत्वाच्या दाखल्यां (लेाश्रिशींळेप) साठी कर्मचारी २-२ लाख रुपये मागतात. नगरसेवकांकडे गेले तर जास्त पैसे लागतील, असा दम देतात. नगरसेवकांनी पण पैसे दिलेत. हे कोणते टोल? हे काय प्रकार सुरू आहेत? आम्ही खपवून घेणार नाही. तेच तेच लोक टाऊनप्लॅनिंगमध्ये कसे असतात? असा सवाल संपत बारस्कर, सागर बोरुडे, कुमार वाकळे यांचा केला. त्यावर बोलताना चारठाणकर म्हणाले, याबाबत चर्चा झाली. सूचना दिल्या आहेत. कामकाजाची पद्धत ठरवली आहे. तीन दिवसात प्रत्येक फाईल तपासून वरीष्ठ अधिकार्‍यांकडे येईल.

चुकीच्या पध्दतीने कुणी सांगत असेल, मागणी करत असेल तर कारवाई केली जाईल. नगरसेवकांकडे गेल्यावर काम होणार नाही, असे कर्मचारी सांगतात. हे काय फुकट काम करतात का? किती पगार आहेत यांना? असा सवाल संपत बारस्कर यांनी केला. ३१ तारखेनंतर आमच्या मर्यादा संपतील. अधिकारी काम करतात, खालचे कर्मचारी नालायक आहेत, बिल्डरच्या घरी बसतात. नगरसेवकांना चुकीची उत्तरे देतात, असे कुमार वाकळे म्हणाले. १०० चौरस फुटाची किती प्रकरणे कोणत्या लार्ककडे प्रलंबित आहेत, त्याची माहिती सभा संपायच्या आत सादर करण्याचे आदेश आयुे डॉ. पंकज जावळे यांनी चारठाणकर यांना दिले. यावेळी महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे यांच्या हस्ते करावे, अशी मागणी शीला चव्हाण यांनी केली. त्यास संपत बारस्कर, कुमार वाकळे यांनी अनुमोदन दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना, त्यांच्या कुटुंबातील व्येी ंना कार्यक्रमाला बोलवा, अशीही मागणी करण्यात आली. महासभेत पथदिव्यांचा प्रश्न सागर बोरुडे यांनी उपस्थित केला. संबंधित ठेकेदार थर्ड पार्टी ऑडिट सुरू असल्याचे सांगून मटेरियल नसल्याचे सांगतात त्यामुळे कामे ठप्प आहेत. त्यावर नवीन पथदिवे का बसवले जात नाहीत, असा सवाल बाळासाहेब बोराटे यांनी केला. त्यावर उत्तर देताना विद्युत विभागाचे बल्लाळ यांनी थर्ड पार्टी ऑडिट पूर्ण झालेले असल्याचे सांगितले. विद्युत विभाग प्रमुख, संबंधित उपायुे व तेथील कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत स्थायी समितीच्या सभेत तुम्ही आश्वासन दिले होते याची आठवण संपत बारस्कर यांनी करून दिली.

आमच्या भागातील पथदिव्यांचा प्रश्न जर मार्गी लागला नाही तर आम्ही कोण आहे ते दाखवतो, तुम्ही काय भाषा वापरता? सभागृहात नुसती गोड गोड बोलून उत्तरे देतात, नंतर काही काम करत नाही, असे सागर बोरुडे म्हणाले. अमरधाम, कब्रस्तानमध्ये तरी लाईट लावा अशी मागणी कुमार वाकळे यांनी केली. पथदिव्यांचे टेंडर बोगस झाले आहे, काही ठेकेदार काम करत नाही, एक महिन्यात प्रश्न मार्गी लागेल, असे आयुे म्हटले होते मात्र ते झाले नाही असे बोराटे म्हणाले. उजेडच पडत नाही, स्पॉट लाईट की स्ट ्रीट लाईट हेच कळत नाही, असे योगीराज गाडे म्हणाले. सर्व ७३ सदस्यांचा एकत्रित फोटो काढून पालिकेत लावा, नवीन प्रथा सुरू करा.. प्रत्येक पंचवार्षिकचा एक फोटो सभागृहात पाहिजेच, असे स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी सुचविले. कुमार वाकळे म्हणाले, बोल्हेगाव परिसरात मोठी रो हाऊस स्कीम केली, त्याला रस्ता नाही, मोठा घोटाळा केला आहे, माझ्या वार्डातील रस्ते बदलले, कमी केले, ले आऊट रीवाईज केले, मोठा स्फोट होणार आहे. १०० ट क्के ओपन स्पेसवर अतिक्रमण झालीत. आम्ही कारवाई करायला सांगितले की आमची नावे त्यांना सांगतात. ३१ तारखेनंतर नागरीक ज्या दिवशी आमच्याकडे येतील, त्या दिवशी संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांना ठोकून काढणार, काय गुन्हे दाखल व्हायचे ते होऊ द्या, ९० ट क्के ओपन स्पेसवर अतिक्रमण आहेत. रस्तेही गायब आहेत. अतिक्रमणातील जागेवर मटका, दारूचे धंदे सुरू आहेत. त्यावर कारवाई करावी, अशी मागणी वाकळे यांनी केली.