महापालिका आवारात २१ डिसेंबर रोजी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण

0
65

 

नगर – अहमदनगर महानगरपालिका प्रशासकीय इमारत आवारात महाराष्ट ्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर बसलेल्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा २१ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वा. आयोजित करण्यात आलेला आहे. सदरचा कार्यक्रम आमदार संग्राम जगताप व महापौर सौ. रोहिणी शेंडगे यांचे हस्ते, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपमहापौर गणेश भोसले, सभापती स्थायी समिती गणेश कवडे, सभागृह नेते विनीत पाऊलबुधे, विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर, सभापती, म.बा.क. समिती सौ. पुष्पा बोरूडे, उपसभापती, म.बा.क.समिती. सौ. मीना चोपडा यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आयुत डॉ. पंकज जावळे, अतिरित आयुत डॉ. प्रदिप पठारे, पदाधिकारी व सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आला आहे. कार्यक्रमास सर्व सामाजिक, सांस्कृतिक संघटना, सर्व शिवप्रेमी तसेच नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महापौर सौ. रोहिणी शेंडगे व आयुत पंकज जावळे यांनी केले आहे.