‘पाच वर्ष घोटाळ्यांचे, नगरकरांच्या वाटोळ्याचे’ घोषणाबाजी करत मनपात भरवली प्रति महासभा

0
38

 

नगर – चालू पंचवार्षिक कालावधीसाठीची मनपाची शेवटची महासभा बुधवारी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र त्या सभेला सुरुवात होण्यापूर्वीच शहर काँग्रेस कार्यकत्यारनी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपात थेट प्रति महासभा भरवली. यावेळी मागील पाच वषारमध्ये झालेल्या विविध घोटाळ्यांवर हल्लाबोल करण्यात आला. पाच वर्ष घोटाळ्यांचे, नगरकरांच्या वाटोळ्याचे, अशी घोषणाबाजी करत कार्यकत्यारनी प्रति महासभा गाजवत मनपा दणाणून सोडली. यानंतर शिष्टमंडळाने मनपा आयुे पंकज जावळे यांची भेट घेतली. यावेळी काळे यांच्यासह दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, सुनील क्षेत्रे, गणेश आपरे, अलतमश जरीवाला, सुनीता भाकरे, जरीना पठाण, मिनाज सय्यद, विकास भिंगारदिवे, सुनील क्षेत्रे, गणेश चव्हाण, रियाज सय्यद, इंजिनीयर सुजित क्षेत्रे, सोफियान रंगरेज, विनोद दिवटे, गौरव घोरपडे, शंकर आव्हाड, किशोर कोतकर आदी उपस्थित होते. प्रति महासभेत कार्यकत्यारनी काळे झेंडे फडकवून महासभेचा निषेध केला. शहरातील सुमारे ४० हजार दुकानदार, व्यापारी यांच्याशी निगडित असणार्‍या जाचक व्यवसाय परवाना शुल्क वसुलीचा विषय महासभेच्या अजेंडावर चर्चेसाठी सुद्धा नमूद करण्यात आलेला नाही. त्याचाही निषेध यावेळी किरण काळे यांनी केला. दुकानदार व्यापार्‍यांनी हे लक्षात ठेवावे की त्यांच्यावर गदा आणणारा निर्णय महासभेने मंजूर केला होता. त्याला व्यापार्‍यांनी तीव्र विरोध करून देखील या निर्णयाला मागे घेण्यासंदर्भात तत्परता महासभा अजेंड्यावर दाखवण्यात आली नाही. याचे उत्तर दुकानदार, व्यापार्‍यांनी येत्या सार्वत्रिक मनपा निवडणुकीत अशांना द्यावे असे आवाहन यावेळी काळे यांनी केले. यावेळी कार्यकत्यारनी व्यापार्‍यांवर अन्याय करणार्‍या भ्रष्टाचाराचा निषेध, स्मशानभूमी खरेदी घोटाळा, पथदिवे घोटाळा, भूखंड वाटप घोटाळा, रस्ते घोटाळा, श्वान निर्बीजीकरण घोटाळा यांच्या निषेधांच्या फलकांसह घोटाळेबाज मनपाचा निषेध, नगरकरांच्या तोंडाला पाने पुसणार्‍या महासभेचा निषेध असे फलक झळकवले.

प्रति महासभेत बोलताना किरण काळे यांनी पाच वषारच्या कार्यकाळाचे पोस्टमार्टम करत हल्लाबोल केला. काळे म्हणाले, या पाच वर्षात पहिले अडीच वर्ष राष्ट ्रवादी, भाजपच्या अभद्र युतीची सत्ता होती याच काळात सर्वाधिक घोटाळे महानगरपालिकेत घडले. त्यानंतरच्या अडीच वषारमध्ये सत्तेचा रिमोट कंट ्रोल हा शहर लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या राष्ट ्रवादीच्या हातामध्ये होता. त्यामुळे संपूर्ण पाच वषारच्या कालखंडामध्ये नगर शहर रस्ते, पिण्याचे पाणी, पथदिवे, गटारी यासारख्या मूलभूत सोयी सुविधांच्या अभावा मुळे त्रस्त झाले. काळे यांनी घोटाळ्यांवरून अनेक गंभीर आरोप केले. ते म्हणाले, नगर शहरातील ७७८ रस्त्यांच्या कामांमध्ये बनावट दस्तऐवज तयार करत शासनाचे शि क्के खोटे तयार करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला गेला. याची अँटीकरप्शनकडून कारवाई सुरू आहे. फेज टू पाणी योजनेचे काम पूर्ण होऊ शकले नाही. नळ जोडणीचे काम अजूनही अपूर्ण आहे. रस्त्यांची दैना अवस्था पाहता कोट्यावधी रुपयांचा निधी रस्त्यांच्या कामासाठी शहरात आणल्याच्या वल्गना करणार्‍या आमदार, खासदार यांना जाहीर आव्हान काँग्रेस देत आहे की त्यांनी हे रस्ते नेमकं आपण कुठे केले आहेत हे नगरकरांना दाखवावे. कारण आम्हाला रस्ते नाही तर सर्वत्र केवळ खड्डेच दिसतात. यामुळे नागरिकांना आरो१/२याचे अनेक गंभीर प्रश्न उद्भवले आहेत. याला मनपा आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप यावेळी काळेंनी केला. श्वान निर्बीजीकरण आणि पथदिवे यांच्या कामावरून देखील काळेंनी यावेळी हल्लाबोल केला. ते म्हणाले श्वान निर्बीजीकरण करण्याच्या कामांची लाखोंची बिले लाटली गेली. मात्र प्रत्यक्षात शहरातील कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी ती वाढली आहे.

शहरात कुत्र्यांच्या प्राणघातक हल्ले नागरिक आणि लहान बालके यांच्यावर होत आहेत. शहराचे एकूणच दहशत, गुंडगिरी आणि विकासाचे व्हीजन नसलेलं राजकारण यामुळे नगर शहर दृष्टचक्रात सापडल आहे. एक जानेवारीपासून प्रशासक राज येणार असून त्यावेळी सर्वच तथाकथित लोकप्रतिनिधी मनपा प्रशासनाविरोधात तुटून पडतील. मात्र हे त्यांनी लक्षात ठेवावं की मागील पाच वर्षात त्यांनी केलेली घाण साफ करण्याचे काम काँग्रेस जनतेच्या आशीर्वादाने यो१/२यरीत्या भविष्यात करून दाखवेल. आयुे – काळे यांच्यामध्ये खडाजंगी रस्ते घोटाळा प्रकरणांमध्ये पोलिस कारवाईसाठी आवश्यक असणारी मूळ बनावट कागदपत्र सादर करण्याचे लेखी पत्र शासकीय तंत्रनिकेतनकडे मागणी करून मागील पाच महिने वीस दिवस उलटून गेले. तरी देखील मनपा दोषींना पाठीशी घालत आहे. या मुद्यावरून काळे यांनी आयुे यांना धारेवर धरले. यावेळी आयुे यांनी काही प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला. यावर काळे संतापले. मात्र आयुे यांनी उपायुे कुरे, शहर अभियंता मनोज पारखे यांना पाचरण केले. यावेळी लवकरात लवकर कारवाई पूर्ण करू असे म्हणत मनपा अधिकार्‍यांनी सारवासारव केल्याचा दावा शहर काँग्रेसने केला आहे.