वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्यास विरोध; ‘शिक्षक’ उतरणार रस्त्यावर

0
77

 

नगर – राज्यातील सर्व शाळांमध्ये ’आपले गुरुजी’ या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी आपले फोटो शाळेत वर्गाच्या दर्शनी भागात लावावेत, अशा सूचना राज्य शासनातर्फे देण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुमारे वर्षभराने आता किती गुरुजींनी आपले फोटो वर्गात लावले आहेत, याचा अहवाल शिक्षण विभागाने तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या संदर्भातील अहवाल शिक्षण विभागाला पुढील काही दिवसांत सादर करावा लागणार आहे. त्यामुळे शासन आणि शिक्षक यांच्यात पूर्वी झालेल्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटाण्याची शयता निर्माण झाली आहे. अशी माहिती शिक्षक भरतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली. जर शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही तर शिक्षक भारती रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असे ही सुनील गाडगे म्हणाले. शाळेत तोतया शिक्षक ठेवणे, स्वत… शाळेत न येणे, असे काही प्रकार शाळांमध्ये उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रत्येक शाळेत शिक्षकाने स्वत… चा फोटो लावावा, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र शिक्षक भारती संघटनेच्या वतीने या निर्णयाचा विरोध करण्यात आला होता.

तसेच शिक्षक शाळेत फोटो लावणार नाहीत, अशी भूमिका घेण्यात आली होती. सुमारे वर्षभरापासून त्यावर पडदा पडला होता. मात्र, हिवाळी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने ’शिक्षकांचा वर्गातील फोटो’ हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुनिल गाडगे याबाबत म्हणाले की, अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाला.त्यामुळे शिक्षण विभागाने ही माहिती मागवली आहे. मात्र,शिक्षक दररोज वर्गात बसतात आणि विद्याथ्यारना शिकवतात.विद्याथ्यारना आपल्या प्रत्येक शिक्षकांची माहिती आणि ओळख असते.त्यामुळे एकाही वर्गात शिक्षक फोटो लावणार नाही ही आमची भूमिका पूर्वीही होती आणि आजही आहे.

राज्यात एकाही वर्गात शिक्षकाचा फोटो लावलेला दिसणार नाही. राज्यातील सर्व शाळांमध्ये ’आपले गुरुजी’ या उपक्रमांतर्गत शिक्षकांनी आपले फोटो शाळेत वर्गाच्या दर्शनी भागात लावावेत, या निर्णयाचा शिक्षक भारती संघटनेकडून विरोध करून हा निर्णय मागे घेण्यात यावा अन्यथा शिक्षक भारती संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचे सुनिल गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा सौ. आशा मगर, सोमनाथ बोंतले, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हासचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, जिल्हा कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, जिल्हा सचिव महेश पाडेकर, संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, सिकंदर शेख, संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, कैलास जाधव, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी, श्रीकांत गाडगे, रेवण घंगाळे, जॉन सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे, सोनाली अकोलकर, विनाअनुदानितच्या अध्यक्षा रूपाली कुरूमकर आदींना सांगीतले आहे.