रस्ते दुरुस्त करुन नागरी सुविधा द्या अन्यथा १९ डिसेंबरपासून मनपासमोर उपोषण

0
65

शहरातील रस्ते दुरुस्त करुन नागरी सुविधा द्या अशी मागणी करताना रिपाईचे (गवई) शिष्टमंडळ.

नगर – शहरातील मुस्लिम समाजाच्या प्रमुख कब्रस्तानमध्ये जाण्यासाठी योग्य रस्ते नसल्याने अंत्यविधीला जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्या रस्त्याचे काम मार्गी लाऊन नागरी सुविधा पुरविण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने करण्यात आली आहे. दफनभूमीकडे जाणार्‍या रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांचे हाल होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रिपाईच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांना सदर मागणीचे लक्ष देऊन लालटाकी येथील हजरत जलालशाह बुखारी, नगर-पुणे महामार्गावरील हजरत हसन शाह कादरी व काटवन खंडोबा रोड येथील जंगेशहीदा कब्रस्तानकडे जाणार्‍या दुरावस्थेप्रश्नी लक्ष वेधले. यावेळी रिपाईचे शहराध्यक्ष दानिश शेख, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, संदीप वाघचौरे, अजीम खान, विनीत पाडळे, निजाम शेख, सुधीर गायकवाड आदी उपस्थित होते. मुस्लिम समाजाचे हजरत जलालशाह बुखारी, हजरत हसन शाह कादरी व जंगेशहीदा कब्रस्तान पिढीपरंपरागत असलेले शंभर वषारपेक्षा अधिक जुने कब्रस्तान आहे. या ठिकाणी मयत झालेल्या मुस्लिम समाजातील व्येी ंना दफन केले जाते. सदर कब्रस्तानला जाणार्‍या रस्त्यांची बिकट अवस्था आहे. रस्त्यावर पथदिव्यांची सोय नसल्याने रात्री गॅसबत्ती घेऊन अंत्यविधीसाठी जावे लागत आहे.

ड्रेनेज लाईनचे पाणी रस्त्यावरुनच वाहत असल्याने मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या दुरावस्थेमुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. पावसाळ्यात कब्रस्तानच्या रस्त्यावरुन जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंत्यविधीसाठी येणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या प्रश्नासंदर्भात वारंवार मागणी करुन देखील मनपा प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मनपा प्रशासनाने कब्रस्तानकडे जाणार्‍या रस्त्यांच्या दुरावस्थेची संपूर्ण माहिती घ्यावी व सदर ठिकाणी ड्रेनेज लाईन, रस्ते काँक्रिटीकरण, पथदिव्यांची सोय करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा १९ डिसेंबर पासून महापालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे