नगर-सोलापूर महामार्गावर शिराढोणजवळील अपघातात नगरचा युवक जागीच ठार

0
80

 

नगर – सोलापूर महामार्गावरील शिरढोण उड्डाणपुलावर शनिवारी (दि.१६) . सकाळी १० वाजण्याच्या . सुमारास बोलेरो व ढंपर यांचा भीषण अपघात झाला. यामध्ये बोलेरोचालक मंगेश दिलीप नागवडे (वय ३७, रा.गुणवडी) जागीच ठार झाला तर ढंपरचालक जखमी झाल्याचे समजते. अपघात इतका जोराचा होता की, बोलेरो जीपच्या पुढील भागाचा चुराडा झाला होता. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. दुपारी उशिरापयरत पोलिसांचे तपासकार्य सुरु होते. नगरला शासकीय रु१/२णालयात पंचनामा करून सायंकाळी ५ वाजता गुणवडी गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मंगेश नागवडे यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, तीन बहिणी, आई, वडील असा परिवार आहे.

शिराढोणजवळ बोलेरो गाडी आणि मालवाहू ढंपर यांची समोरासमोर धडक झाली. महामार्गाचे काम चालू आहे. प्रशासनाने डायव्हर्जन पारदर्शी दाखवले नसल्याने हा अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे. नगरकडे व सोलापूरकडे जाताना कधी कधी दोन्ही बाजूने एकाच मार्गावरून गाड्या जातात, याचा परिणाम अपघातात होतो आहे.