मोहन रक्ताटे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

0
89

मनसे नेते वसंत मोरे यांचे अप्पर पोलिस अधिक्षकांना निवेदन

 

नगर – मोहन आत्माराम रेाटे यांना आत्महत्या करण्यासाठी कारणीभूत असलेल्या संबंधित इसमांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. या मागणीचे निवेदन महाराष्ट ्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे यांना देण्यात आले. याप्रसंगी मनसे नेते वसंत मोरे, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, महिला जिल्हाध्यक्ष अनिता दिघे, शहर सचिव डॉ. संतोष साळवे, वाहतूक सेना शहराध्यक्ष अशोक दातरंगे, उपशहराध्यक्ष तुषार हिरवे, उपशहराध्यक्ष संकेत व्यवहारे, उपशहराध्यक्ष संदीप चौधरी, विभाग अध्यक्ष किरण रोकडे, मनविसे जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, संकेत जरे, अनिकेत शियाळ, प्राची वाकडे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, मोहन आत्माराम रेाटे यांनी १० डिसेंबर रोजी रा. चिचोंडी पाटील येथे विष प्राशन करून आत्महत्या केली, आत्महत्येचे कारण त्यांनी एका पत्राद्वारे महाराष्ट ्र नवनिर्माण सेनेकडे तक्रार केली होती, मोहन रेाटे यांनी येस बँक अहमदनगर येथून एका टेम्पोसाठी कर्ज घेतले, काही दिवसांचे हप्ते थकले म्हणून त्यांचा टेम्पो ओढून नेण्यात आला. त्यांनी तो सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु तो सुटला नाही पैसे जमवले ते देण्यासाठी बँकेत गेले तेव्हा बँकेवाल्यांनी सांगितले, ‘तुमची गाडी विकली आहे’ त्यामुळे मोहन रेाटे अतिशय वैफल्यग्रस्त झाले, यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये दोन-तीन व्येी ंची नावे लिहिलेली आहेत.

यासंबंधी जे कोणी मोहन आत्माराम रेाटे यांना आत्महत्या करण्यासाठी कारणीभूत असलेल्या संबंधित इसमांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निवेदनात म्हटले आहे. यानंतर मनसेचे पदाधिकारी येस बँकेमध्ये गेले असताना तेथील कर्मचार्‍यांनी कोणतेही प्रकारचे सहकार्य केले नसल्यामुळे व तिथल्या मॅनेजर आत्महत्येस कारणीभूत असल्यामुळे निषेध म्हणून येस बँकेच्या पार्टीला मनसेच्या पदाधिकारी काळे फासले. यावेळी सुनील अंधारे, गणेश भोकरे, अनिता दिघे, प्राची वाकडे, तुषार हिरवे, अशोक दातरंगे, संदीप चौधरी, प्रकाश गायकवाड, अनिकेत शियाळ, अंबरनाथ भालसिंग, प्रवीण गायकवाड आदि उपस्थित होते.