मनपा आयुक्तांनी लेखी आश्वासन देवूनही सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम ‘अर्धवट’च

0
95

८ दिवसात कार्यवाही न केल्यास ‘टेंभे आंदोलन’ करण्याचा गुलमोहोर रोड परिसरातील संतप्त नागरिकांचा इशारा

नगर – सहा महिन्यात गुलमोहोर रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देऊनही महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराने कोणतीच कार्यवाही केलेली नसून, त्यावेळी संथगतीने सुरू असलेले रस्त्याचे काम मागील सहा महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत बंद ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर या रस्त्याच्या अनुषंगाने करावयाची इतर कोणतीही कामे करण्यात आलेली नाहीत. महापालिका आयुेांनी लेखी आश्वासन देऊन केवळ वेळकाढूपणा केल्याचे समोर येत असून, या रस्त्याच्या कामासाठी कायद्याच्या चौकटीत राहून उपोषण करणार्‍या आंदोलकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. येत्या आठ दिवसात गुलमोहोर रस्त्याच्या कामाबाबत ठोस कार्यवाही न केल्यास ‘टेंभे आंदोलन’ करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. यासंदर्भात नागरिकांनी १५ डिसेंबर रोजी महापालिका आयुेांना निवेदन दिले असून, गुलमोहोर रस्त्याबाबत आतापयरत केलेल्या पाठपुराव्याची कागदपत्रेही सादर केली आहेत. संथगतीने सुरू असलेले गुलमोहोर रस्त्याचे काम वेगाने आणि दर्जेदार व्हावे तसेच या कामाच्या अनुषंगाने रस्त्याच्या मधील इलेट ्रीक पोल बाजूला हटविणे, रस्त्याच्या बाजूची अतिक्रमणे हटवून रस्ता १८ मीटर रुंदीचा करणे आदी कामे तातडीने करावीत, यासाठी शिरीष जानवे, महेश घावटे, अभिजित दरेकर यांच्यासह नागरिकांनी त्यावेळी पारिजात चौकात उपोषण सुरू केले होते.

सदरचे आंदोलन मागे घेण्यासाठी महापालिका आयुेांनी आंदोलकांना लेखी आश्वासन देत सदरची सर्व कामे सहा महिन्यात पूर्ण करण्यात येतील, असे सांगितले होते. तथापि आजमितीस यापैकी एकही काम पूर्ण झालेले नाही. मागील सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम पूर्णत… बंद पडलेले आहे. अर्धा कि.मी. रस्त्याचे काम पूर्ण असून, दीड कि.मी.चे दोन लेअर देणे बाकी राहिले आहे. रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे पोल ‘जैसे थे’ असून, अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही केवळ जुजबी करण्यात आली आहे. त्यामुळे लेखी आश्वासनाप्रमाणे एकही काम सहा महिन्यात झालेले नसून, प्रशासनाने केवळ वेळकाढूपणा चालविल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे महेश घावटे म्हणाले. मध्यंतरी शहर अभियंत्याने रस्त्याच्या कामासंदर्भात संबंधित ठेकेदार कंपनी, महापालिकेचा विद्युत विभाग, नगररचना विभाग यांच्याशी पत्रव्यवहार केला मात्र संबंधित विभागाने या पत्रावर कोणतीही कार्यवाही न केल्याने आज सर्व कामे ‘जैसे थे’ अवस्थेत आहे.

त्यामुळे परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुेांना निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, गुलमोहोर रस्त्याचे रूंदीकरण व मजबुतीकरणाचे काम करण्यात येत आहे. गुलमोहोर रस्ता हा बर्‍याच वषारपासून दयनीय अवस्थेत होता. काम सुरू झाल्यानंतर सर्व रहिवाश्यांना आनंद व समाधान झाले होते. या रस्त्याचे काम, मंजुर लांबी व रूंदीनुसार उत्तम दर्जाचे व्हावे म्हणून २३/१२/२०२१ रोजी आपणास सक्षम भेटून निवेदन दिले होते. त्यानंतर काम सुरू झालेले आहे. परंतु ते अत्यंत संथगतीने तसेच कुठलेही मानांकन न पाहता चालू आहे. त्यामुळे ३१/३/२०२२ रोजी स्थानिक नगरसेवकांनी आपल्याला कल्पना देऊन आंदोलन देखील केले होते. त्यावेळेस ३१/५/२०२२ अखेर काम पूर्ण करण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात दिले होते. सदर कामाबाबत परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी येऊन आपली समक्ष भेट देखील घेतली. २०/२/२०२३ रोजी नागरिकांनी पारिजात चौक येथे उपोषणदेखील केले होते. त्यावेळी २२/२/२०२३ रोजी उपोषणकर्ते व मनपा अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार ६ महिन्यात सर्व कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन आपण दिले होते.

तरीदेखील आद्यापपावेतो कुठलेही काम पूर्ण झाले नाही. सहा महिने पूर्ण होऊनही कुठलेही काम पूर्ण न झाल्याने १/९/२०२३ रोजी नागरिक आपल्या भेटीस आले होते. त्यावेळी तुम्ही वेळकाढूपणा करून शहर अभियंता यांना सदर पत्रावर संबंधीत सर्व विभागप्रमुखांची व नागरिकांची ७/९/२०२३ रोजी दु. ४ वाजता मिटींग करावी, असा लेखी आदेश दिला होता. तरीदेखील अद्यापपावेतो मिटींग देखील केली नाही व रस्त्याचे कामदेखील पूर्ण केले नाही. तरी पुढील ८ दिवसात कुठलीही कार्यवाही केली नाही तर परिसरातील सर्व नागरिक टेंभे घेऊन तीव्र आंदोलन करतील, असा इशारा जानवे, घावटे व दरेकर यांनी दिला आहे.