मराठा व ओबीसीत तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींना आवर घालावा

0
111

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

 

नगर – माजी मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत १३ डिसेंबर रोजी संविधानिक पदावरून शेंडी गावातील महिला सरपंच गावबंदी बाबत सरळ सरळ खोटे म्हणणे मांडलेले आहे. तसेच सरपंच प्रयागाबाई लोंढे यांना गावबंदी ही ते कोणत्या सभेला गेल्या म्हणून केली नव्हती तर त्यांनी त्यांच्या भागातील काही व्हॉट२सअ‍ॅप ग्रुपवर त्यांनी जे बेताल व खालच्या पातळीला आणि एका सरपंच महिलेला अशोभनीय असे वेव्य केले होते, त्यावरून त्यांचा गावकर्‍यांनी निषेध केला होता. त्या महिला सरपंचांना कुठलीही गाव बंदी नसून त्या ग्रामपंचायत कार्यालयात नित्याने येत आहे. आणि गावातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रमास ही त्यांची उपस्थिती आहे. परंतु मंत्री छगन भुजबळ हे हिंगोलीच्या जाहीर सभेत तसेच विधानसभेमध्ये दोन समाजात जातीय तेढ निर्माण व्हावी, या उद्देशाने महिला सरपंच सभेला आली म्हणून तिला शेंडी गावातील मराठा समाजाने गाव बंदी केली असे खोटे आरोप मराठा समाजावर करत आहे. सदर महिला मराठ्यांच्या आरक्षणावरून मराठा समाजाला हिणवण्याची भाषा खाजगीत बोललेली आहे.

म्हणून अप्रत्यक्ष पाठीमागे हिणवण्याचे काम करते त्या एका महिलेच्या भूमिकेने आम्हाला दोन समाजात वाद निर्माण करायचा नाही त्या ज्या पद्धतीने दोन समाजात वाद घडवण्याचा प्रयत्न करत आहे. ते थांबले पाहिजे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठिंब्यावर मी या मराठ्यांना चांगला धडा शिकवीन अशी या महिलेचे भाष्य आहे. तरी या विषयी गांभीर्याने लक्ष घालून त्या महिलेला आणि माजी मंत्री भुजबळ यांना भडकाऊ भाषण करण्यापासून थांबवावे. मंत्री भुजबळ हे मुद्दामहून मराठा आणि ओबीसी वाद पेटवण्याचे निष्कर्षाने जाणवत आहे. तरी महिला सरपंच प्रयागाबाई लोंढे व मंत्री छगन भुजबळ हे मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण करत असून तात्काळ त्यांना आवर घालण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे गोरख दळवी, अभय शेंडगे, अवधूत पवार, संदीप जगताप, आदिनाथ कांडेकर, निलेश कराळे, प्रवीण गुंड, अक्षय भगत, चांगदेव भगत, ओंकार चव्हाण आदी उपस्थित होते.