शोरुममधूनच विनापासिंग नव्या दोन दुचाकींची चोरी

0
66

 

नगर – शोरुममध्ये विक्रीसाठी आणलेल्या यामाहा कंपनीच्या दोन नव्या दुचाकी ंची चोरी झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी उघडकीस आली. सदरची घटना संजोग हॉटेल समोरील बन्सल मोटर्स शोरुममध्ये घडली. यासंदर्भात शोरुमचे संचालक अंचित राजेश बन्सल यांनी तोफखाना पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, संजोग हॉटेल समोर यामाहा कंपनीच्या मोटारसायकल विक्रीचे बन्सल मोटर्स नावाचे आमचे शोरुम असून, या शोरुममध्ये दर महिन्याला विक्रीसाठी असलेल्या गाड्यांचा पूर्ण स्टॉक चेक केला जातो. १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मी शोरुममधील एफझेडएस कंपनीच्या मोटारसायकलचा स्टॉक चेक केला असता त्यावेळी एकूण स्टॉकमध्ये दोन एफझेडएस मोटारसायकल दिसून आल्या नाहीत.

त्यामध्ये प्रत्येकी १ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या ग्रे व ब्लॅक कलरची एफझेडएस विनापासिंग गाड्यांचा समावेश आहे. शोरुमच्या आजूबाजूस तसेच अहमदनगर शहरात या मोटारसायकलींचा शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत.यासंदर्भात तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.