‘छत्रपती संभाजी महाराज आयुर्वेदिक निसर्गोद्यान’ नाव देण्याचा ठराव महानगरपालिकेने मंजूर करावा

0
77

विविध पक्ष, संघटनांची स्थायी समिती सभापतींकडे निवेदनाद्वारे मागणी

 

नगर – सावेडी उपनगरातील पद्मावती पेट ्रोल पंपामागील वाकळेनगर येथे लोकसहभागातून साकारत असलेल्या ‘आयुर्वेदिक निसर्गोद्याना’स ’छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड, आम आदमी पार्टी, कामगार संघटना महासंघ, भगतसिंह हॉकर्स संघटना, सकल भारतीय समाज आणि समविचारी पक्ष संघटना यांनी महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांच्यासह आयुे, महापौर, उपमहापौर, विरोधीपक्ष नेता यांना भेटून केली आहे.

त्यासाठी पुरवणी अजेंडा काढण्याची सूचना स्थायी समिती सभापती कवडे यांनी स्वीय सहाय्यक भुसारे केली. याबाबत अधिक माहिती देताना भैरवनाथ वाकळे आणि भरत खाकाळ यांनी सांगितले की, सावेडी उपनगरातील पद्मावती पेट ्रोल पंपामागील भागातील वाकळेनगर येथील रेखांकनातील अंदाजे १७ गुंठे खुल्या जागेवर (ओपनस्पेस) आमच्या पक्ष संघटना यांच्यावतीने लोकसहभागातून ’छत्रपती संभाजी महाराज आयुर्वेदिक निसर्गोद्यान’ संभाजी राजांच्या स्मृती नव्या पिढीस कायम रहाव्यात, यासाठी आयुर्वेदिक वनस्पतींचे निसर्गोद्यान उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले, शिवरायांच्या पुर्वजांनी नगरमध्ये निमाजशाहीत कार्यरत राहून मोठमोठे पराक्रम केलेले आहेत. शिवरायांचे आजोबा मालोजी भोसले, विठूजी जाधव आदींनी येथे कर्तृत्व गाजवले आहे. खुद्द शहाजीराजांनी १६२४ च्या भातोडीच्या लढाईत मोठा पराक्रम केला होता. त्यामुळे त्यांना ’सरलष्कर’ हा किताब मिळाला होता. शिवरायही अहमदनगरला दोन वेळेस येवून गेल्याचे इतिहासकार सांगतात. छत्रपती संभाजी महाराज हे नव्या पिढीचे आदर्श आहेत. त्यांचे कार्यकर्तृत्व नव्या पिढीसमोर सतत रहावे.

यासाठी पक्ष संघटनांच्या वतीने आयुर्वेदिक वनस्पतींचे निसर्गोद्यान उभारण्यात येत आहे. लवकरच तेथे जाहीर कार्यक्रम घेऊन वृक्षारोपण करून निसर्गो द्यानाची सुरूवात करण्यात येणार आहे. सावेडी स.नं.२३८ (भाग), २३८/२अ२ आणि २३९ (भाग) या जिल्हाधिकारी आदेश क्र.मह/कार्या/३ब/ एनएएसआर/१३६/२००८, दि.१५/०७/२००९ या मनपा मंजुर आणि विकसित करून ताब्यात घेतलेल्या रेखांकनातील अंदाजे १७ गुंठे ओपन स्पेसला त्वरीत ठराव घेऊन अथवा आपल्या अधिकारात ’छत्रपती संभाजी महाराज आयुर्वेदिक निसर्गोद्यान’ नाव देण्यात यावे, असे ते म्हणाले. यावेळी आम आदमी पार्टीचे विद्या जाधव- शिंदे, गणेश लोखंडे, सचिन एकाडे, रवी सातपुते, राजेंद्र कर्डीले, विक्रम क्षीरसागर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे फिरोज शेख, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे अरूण थिटे, संभाजी ब्रिगेडचे दिगंबर भोसले आदी उपस्थित होते.