‘सबजेल’ मध्ये आरोपीचा गोंधळ, गुन्हा दाखल

0
74

 

नगर – सबजेल कारागृहातील संशयीत आरोपीने नातेवाईकांना भेटण्यासाठीचा वेळ वाढवून न दिल्याने आरडाओरडा करून गोंधळ घातला. साहिल मोहंमद शाकीर सय्यद असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सबजेल कारागृहातील महिला पोलीस अंमलदार मिरा उत्तम हेगडे यांनी तक्रार दिली आहे. सय्यद एका गुन्ह्यात सबजेल कारागृहात असून त्याला भेटण्यासाठी नातेवाईक कारागृहात आले होते. त्यांच्यात मुलाखत कक्षात भेट झाली.

त्यावेळी सय्यद याने नातेवाईकांना भेटण्यासाठी दोन मिनिटे वेळ वाढवून मागितला असता अंमलदार हेगडे यांनी दोन मिनिट वेळ वाढवून दिला. दरम्यान सय्यद याने आणखी दोन मिनिटाचा वेळ वाढवून मागितला असता अंमलदार हेगडे यांनी नकार दिला. त्याचा राग आल्याने सय्यद याने मुलाखत कक्षात आरडाओरडा करून गोंधळ घातला. मुलाखत कक्षातील काचेवर जोराने हात मारून नुकसान केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.