नरेंद्र मोदी सरकारच्या विकसित भारत यात्रेच्या गाडीवर इंधन फेक

0
90

श्रीगोंदा – सध्या राज्यामध्ये मोदी सरकारने आपला संकल्प विकसित भारत या नावाने यात्रा सुरू केली असून, गावागावात एका चारचाकी वाहनात एलईडी स्क्रीन लावून त्यावर मोदी सरकाने केलेली विकासकामे, शैक्षणिक, सामाजिक धोरणे, सरकारचा संकल्प आदी कामे त्यावर दाखवली जात असतात. बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात विकसित भारत यात्रा कार्यक्रम संध्याकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला होता. यावेळी सकाळी ११ वाजता ही गाडी त्या गावात आली असता कोणीतरी अज्ञात व्येीने या गाडीवर इंधनासारखा द्रव पदार्थ टाकला आणि त्यानंतर तो व्येी फरार झाला. यामुळे गाडीत असणार्‍या स्क्रीनचे किरकोळ नुकसान झाले आहे.

सदर . घटनेबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बेलवंडी पोलीस करीत आहेत. सध्या मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने कांद्याचे भाव घसरले आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज झाला असून सरकारच्याविरोधात शेतकर्‍यांचा हा उद्रेक असल्याचे बोलले जात आहे.