अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होईल

0
96

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

 

नगर – अहमदनगर महानगरपालिका कर्मचार्‍यांचा अनेक वर्षापासून सातवा वेतन आयोगाचा प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी कर्मचार्‍यांच्यावतीने मुंबई येथे लाँग मार्च सुरू करण्यात आला होता. त्यामुळे सर्व कर्मचारी लाँग मार्चमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून मनपा कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानुसार नागपूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, असून यावरती सकारात्मक चर्चा झाली आहे आणि लवकरच अहमदनगर मनपा कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू होईल. याचबरोबर सफाई कामगारांचा वारस हाकाचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियात असून हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट ्रातील कर्मचार्‍यांचा आहे यावर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र बैठकीचे आयोजन केले जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे. तसेच अहमदनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातून सुमारे १३ किलोमीटरचे सीना नदीचे पात्र असून सीना नदीची हद्द निश्चित झाली आहे. आता सीना नदीचे पात्र मातीने भरलेले आहे.

त्यामुळे पावसाळ्यात येणार्‍या पुराचा धोका शहरवासीयांना बसू शकतो यासाठी पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण व्हावे यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी प्रत्यक्षात येऊन सीना नदीची पाहणी केली होती. त्यानुसार प्रस्ताव तयार केला असून त्या प्रस्तावाला मंजुरी मिळून निधी उपलब्ध व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे. लवकरच खोलीकरणासाठी निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री यांनी दिले आहे.

खोलीकरण झाल्यानंतर पूर रेषेचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. अशी माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील,अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग, अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग, प्रधान सचिव नियोजन विभाग, प्रधान सचिव नगर विकास विभाग, आयुे डॉ.पंकज जावळे, महादेव कोतकर, डी. डी. गायकवाड, उपायुे श्रीनिवास कुर्‍हे, नगर मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंद लोखंडे, सचिव अनंत वायकर, जल अभियंता परिमल निकम आदी उपस्थित होते.