‘रस्ता बंद’ केल्याने अधिकाऱ्यांच्या विरोधात माजी सैनिकांचे नगरमध्ये आमरण उपोषण सुरु

0
33

 

आज दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी दुपारी चार वाजल्यापासून सैनिक महासंघाचे अध्यक्ष श्री संजय शिरसाट आणि प्रहार सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष श्री विनोद परदेशी यांच्यापाशी अहमदनगर सोलापूर रोड जामखेड रोड यांना जोडणारा मिलिटरी च्या भागातील माजी सैनिकांचा रस्ता स्टेशन हेडकॉटरच्या आखत्यारीत असणाऱ्या मिलिटरी युनिट्सने बंद केला आहे.

वरील बातमीची माहिती मिळताच
पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार यावेळी स्टेशन हेडकॉटर विरुद्ध उघडण्याचा निर्धार वरील उपोषणकर्त्यांनी केला.
महाराष्ट्रातील माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास सैनिक महासंघ त्या त्रासाचा मुळापासून विनाश केल्याशिवाय राहणार नाही.

कोणीही माजी सैनिकांच्या भावना दुखावल्यास माझे सैनिक आता सहन करून घेणार नाही.
सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा मिल्ट्री हद्दीतील रस्ते मिल्ट्रीने परस्पर बंद करू नयेत असा निर्वळा दिला असताना केवळ स्वतःच्या मन मर्जीने आपल्या भागातील रस्ते बंद करून आपली दादागिरी दाखवण्याचा प्रताप मिलिटरी चे काही अधिकारी करत आहेत यांना कायदेशीर पद्धतीचे भान राहिलेले नाही अशा मुजोर अधिकाऱ्यांच्या विरुद्ध माजी सैनिक आमरण उपोषणाच्या मार्गाने संविधानिक पद्धतीने लढा देऊन आपल्या समस्या सोडवल्याशिवाय आता थांबणार नाहीत.