देशाच्या जडणघडणीमध्ये सैनिकांचे मोठे योगदान

0
59

नगर – देश सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सैनिक पार पाडत असल्यामुळे भारतीय नागरिक आपले जीवन सुरक्षित व आनंदाने जगत आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये सैनिकांचे मोठे योगदान आहे. आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्याचे काम ते करत आहे. याचबरोबर इतर देशांवर अंकुश ठेवून भारतीय सैनिक अभिमान वाटेल असे कार्य करत आहेत. कर्नल लक्ष्मण चितळे यांनी देशाच्या तीन युद्धामध्ये सहभाग घेतला होता. १९७१ साली युद्धामध्ये पाकिस्तानने हार मानून भारतासमोर शरणागती पत्करली होती, आज तो विजय दिवस माजी सैनिकांनी साजरा केला असून कर्नल लक्ष्मण चितळे यांच्या हस्ते हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली असल्याचे माजी नेव्ही कमांडर व परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल जोशी यांनी सांगितले. अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद महाराष्ट ्र आणि गोवा शाखा, अहमदनगर यांच्यावतीने विजय दिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी कर्नल लक्ष्मण आनंदराव चितळे, अनिल जोशी, प्रांत कोषाध्यक्ष राहुल जाधव, उपजिल्हाध्यक्ष सदाशिव भोळकर, मनसुख वाबळे, भाऊसाहेब वाबळे, देविदास हजारे, राजाराम रोहकले, शिवाजी मुळे, भगवान कोल्हे, अशोक वाबळे, किसनराव सातपुते, मारुती कराळे, अशोक वाघ, आबासाहेब पवार, मच्छिंद्र कोलते, संजय पाटेकर, शिवाजी मुळे, आप्पासाहेब कुलट, तैय्यब बेग, किशोरभाई शहा, राम वडागळे आदींसह माजी सैनिक उपस्थित होते. हुतात्मा स्मारक येथे विजय दिवस साजरा भारत पाकिस्तानच्या सन १९७१ सालीच्या युद्धात आम्ही पाकिस्तानला शरणागती घ्यायला लावली. आज वयाच्या ९० व्या वर्षी मी विजय दिवस साजरा करीत आहे. त्या आठवणीला उजाळा मिळाला आहे. ३२ वर्ष सैन्य दलामध्ये देशसेवा करत असताना १९६२-६५ आणि ७१ सालीचा युद्धामध्ये आम्ही सैनिकांनी देशसेवा केली त्याचा अभिमान मला आहे, असे मत कर्नल लक्ष्मण चितळे यांनी केले.