नगरसेवक स्वप्निल शिंदे याच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव

0
75

 

नगर – राष्ट ्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर खून प्रकरणी सध्या तुरुंगात असलेला भाजपाचा नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे याच्यावर मो क्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव नाशिक विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी मंजूर केला आहे. लवकरच नगरसेवक शिंदेवर मो क्कान्वये कारवाई केली जाणार आहे. १५ जुलै रोजी रात्री अंकुश चत्तर यांच्यावर सावेडीतील एकविरा चौकात प्राणघातक हल्ला झाला होता. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार भाजपाचा नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे, अक्षय प्रल्हादराव हाके, अभिजीत रमेश बुलाख, महेश नारायण कुर्हेग, सुरज ऊर्फ विकी राजन कांबळे, मिथुन सुनील धोत्रे, राजू फुलारी, अरुण पवार यांना अटक केली होती. ते सध्या तुरुंगात आहेत. यामध्ये तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती.

या प्रकरणाचा तपास आधी तोफखाना पोलीस स्टेशन करीत असतानाच हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. स्वप्निल शिंदे याच्यावर याआधी अनेक गंभीर होण्याची नोंद असल्याने त्याच्या विरोधात मो क्का अन्वये कारवाई करण्यासाठी पोलिसांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्फत नाशिक विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे प्रस्ताव पाठवला होता. तो प्रस्ताव मंजूर झाला असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली असून भाजपच्या नगरसेवकावर लवकरच मो क्का अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.