महापालिकेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेचे २० डिसेंबर रोजी आयोजन

0
54

 

नगर – महापालिकेची सर्वसाधारण सभा येत्या बुधवारी (२० डिसेंबर) आयोजित करण्यात आली आहे. सन २०२३-२४ चे पूनर्विनियोजन अंदाजपत्रक, सावेडी कचरा डेपोच्या जागेत कोल्हाटी समाजाला दफनभूमीसाठी जागा देण्यासह इतर विविध विषयावर ही सभा होणार आहे. दरम्यान, नगरसेवकांचा कार्यकाळ ३१ डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे ही शेवटची सभा ठरण्याची शयता आहे. सभेत १५ सप्टेंबरच्या सभेचे इतिवृत्त कायम करणे, विद्युत विभागातील कामांची सुरक्षा अनामत र क्कम अदा करणे, नागापूर येथे भटया कुत्र्याच्या हल्ल२यात मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देणे, सारसनगर परिसरात व प्रभाग पाच मध्ये ओपन जीम बसविणे, विविध घटकांसाठी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, महिला सशेीकरण अशा सामाजिक उपयोगासाठी खुली जागा भाडे तत्वावर देणे, बुरुडगाव रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या रु१/२णालयाला राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, असे नाव देणे, मिस्कीन नगर भागातील रस्त्याला ओम खोपेश्वर मार्ग नाव देणे, महात्मा फुले चौक ते सावित्रीबाई फुले नगरकडे जाणार्‍या पुलास छत्रपती संभाजी महाराज पूल असे नाव देणे, कायनेटीक चौकाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असे नाव देणे, लालटाकी भागातील निर्मल चेंबर चौकाचे आद्यक्रांती गुरु लहुजी साळवे चौक असे नाव देणे, प्राथमिक आरो१/२य केंद्रास कै. डॉ. रखमाबाई राउत असे नाव देणे, राज चेंबर, फलटन पोलिस चौकी येथील चौकाला भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद असे नाव देणे, ७० व्या वरीष्ठ गट पुरुष राष्ट ्रीय अजिंयपद स्पर्धेला निधी देणे आदी विविध विषयांवर चर्चा होऊन निर्णय होणार आहे.