एमआयडीसीमधील रस्ते त्वरीत दुरूस्त करावेत

0
44

अपूर्ण कामे ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा मोठे आंदोलन उभारणार : डॉ. दिलीप पवार

 

निंबळक – नगर एमआयडीसी अंतर्गत असणारे बहुतांश रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना व सर्व कामगार वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यावर अनेक छोटे मोठे अपघात होत असुन काही जणांचे अपघाती मृत्यु झाले आहेत. अनेक ठिकाणी रात्री स्ट ्रीट लाईट नसल्याने गैरप्रकार घडत आहेत. तरी या भागातील रस्ते त्वरित दुरुस्त करावे, या मागणीचे निवेदन एमआयडीसीचे उपअभियंता संदीप बडगे यांना डॉ. दिलीप पवार यांनी दिले आहे. या मध्ये पोलिस स्टेशन ते सुविधा हॉटेल रस्ता, दत्त हॉटेल ते सीमलेस कंपनी रस्ता, गॅस कंपनी ते होगानस कंपनी रस्ता, साहिब बेकर्स समोरील रस्ता, मिरावली ते श्री टाईल्स रस्ता, एल ब्लॉक मधील भूमिगत गटार, आणि मुख्य म्हणजे सनफार्मा कंपनी ते निंबळक हा रस्ता अपूर्ण असुन त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत

त्यावरील डांबरीकरण, स्ट ्रीट लाईट, फूटपाथ, दुभाजक आदी बाबी अपूर्ण असुन या ठिकाणी अनेक अपघात घडत आहेत. याबाबत आपल्या कार्यालयाकडे तत्कालीन अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. परंतु कुठलीच कार्यवाही झाली नाही. हा रस्ता अपूर्ण ठेवणार्‍या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी व लवकरात लवकर ही अपूर्ण कामे सुरु करावीत अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगर पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, बी. डी कोतकर, निलेश पाडळे व निंबळक गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.