जीवन चक्र

0
89

जानेवारी १९७३ मध्ये हुजूर महाराज संत कृपालसिंहजी यांच्याकडून मला बामदान (दिक्षा) अनुग्रह मिळाला. महाराजजींशी माझी भेट ही खुप संक्षिप्त परंतु अविस्मरणीय राहिली. सन १९७४ मध्ये महाराजर्जीच्या परमधामास पोहचण्यापुर्वीच मी दयाल पुरूष संत दर्शनसिंहजी महाराजजींना संत कृपालसिंहजी महाराजांचे उत्तराधिकारी मानत असे, याचे दोन कारण आहेत. पहिले म्हणजे माझ्यात असणारी आध्यात्मिक अपरिपक्वता, म्हणजे माझे असे म्हणणे होते की, वडीलांनंतर त्यांचा पुत्र (मुलगाच) उत्तराधिकारी असु शकतो. दुसरे असे की संत दर्शनसिंहजी महाराज व माताजी मला एकत्र भेटले आणि जेव्हा मी त्यांचे अभिवादन करत असे, तेंव्हा ते माझ्या अभिवादनाचे उत्तर असे देत की जणू ते मला पहिल्यापासून ओळखत आहेत. ते मला भाई साहब म्हणून बोलवत असत. संत कृपालसिंह महाराजजींच्या शरीर सोडण्यानंतर उत्तराधिकारी कोण असणार याबाबत अनेक चर्चा होत असत. मी देखील त्यापासून दूर राहू शकलो नाही. एक दिवस मी घरामध्ये अंथरूणात पडल्या पडल्या विचार करत होतो की, महाराजर्जीचे खरोखरच कोण उत्तराधिकारी असणार, तेव्हा माझ्या बंद डोळ्यासमोर संत दर्शनसिंहजी महाराजांची एक अस्पष्ट अशी आकृती प्रकट झाली. मला असा विश्वास दृढ करून गेला की संत दर्शनसिंहजी महाराज हेच संत कृपालसिंहजी महाराजजींचे उत्तराधिकारीच्या रूपात कार्य करतील.

सकारात्मक अध्यात्म – महाराजजी आम्हास सकारात्मक आध्यात्म ाचीच शिकवण देत असत. एकदा माझी एक विभागीय परीक्षा होती, ज्यामध्ये पास झाल्यावर माझे ऑफीसमधील पद आणि पगार दोन्ही गोष्टी वाढणार होत्या, परंतु मी सत्संग आणि भजन (ध्यान अभ्यास) यामध्ये खुप तल्लीन (मग्न) होतो की, परीक्षेला बसण्याची माझी इच्छा नव्हती. फक्त ध्यानधारणा व सेवा करण्याची इच्छा होती. महाराजजींच्या निवासस्थानी जेव्हा मी त्यांना माझी मनस्थिती सांगितली. महाराजजी लगेच म्हणाले, आपली जबाबदारी पुर्ण न करणे ही महाराजजींची शिकवण नाही. तुमच्या सर्व संसारातील जबाबदार्‍या पुर्ण करून तुम्हास आध्यात्मिक मार्गावर अग्रेसर रहायचे आहे. तद्नंतर मी परीक्षामध्ये उत्तीर्ण झालो आणि आज मी भारत सरकारचा एक राजपत्रिक अधिकारी आहे. हे सर्व काही त्यांच्या दया मेहेर (कृपा आशिर्वादाने) शक्य झाले.

(कृपाल आश्रम, अहमदनगर)