साहीत्य – ३०० ग्रॅम कोबी, १ वाटी हरभर्याची डाळ, १/२ वाटी तूरीची डाळ, १ चमचा गरम मसाला, १ लिंब, कढीपत्ता, कोथींबीर, १/२ चमचा साखर, मीठ, तेल, हिंग, हळद.
कृती – दोन्ही डाळी दोन तास भिजत घाला. नंतर वाटून घ्या. कोबी किसून घ्या. नंतर सर्व एकत्र करून गोळा तयार करून घ्या. एका थाळीला तेलाचा हात फिरवा. त्यात वरील गोळा थापा. नंतर कुकरमध्ये ठेवून वाफवून घ्या. गार झाल्यावर चौकोनी वड्या कापा व तव्यावर तेल घालून तळा.