जीवन चक्र-कर्म चक्र

0
23

एकदा गुरुगोविंद सिंहजी महाराज घोड्यावर बसून कुठेतरी जात होते. त्याच वेळी एक स्त्री त्यांच्या घोड्यासमोर येऊन उभी राहिली आणि संतान प्राप्तीसाठी भीक मागू लागली. तिला मुलबाळ नव्हते आणि तिला मुलबाळ होणार ही नव्हते कारण ती वांझ होती. सच्चे बादशाह म्हणाले, बाई, तु आणखीन कोणताही वर माग पण ती बाई आपल्या मागणीवरच अडून राहिली आणि संतान प्राप्तीचीच इच्छा प्रगट केली. यावर गुरूसाहेब म्हणाले इथे तर कुठेच कागद किंवा कलम नाही तर मी कसा लिहू? मग विचार करून म्हणाले, इथे एक मडक्याचा तुटलेला तुकडा पडलेला आहे, तो मला दे. जेव्हा गुरूजींना तो तुकडा दिला, तेव्हा त्यांनी त्याच्यावर आपला आदेश लिहिला – ’1’ म्हणजे एक मुल पण तेव्हा घोडा खिदळला आणि त्या ’1’ अक्षराचे 7 मध्ये परिवर्तन झाले आणि त्या वांझ स्त्रीला सात मुले झाली. अशाच तर्‍हेची घटना माझ्याबरोबरही घडली. मी संत कृपालसिंहजींकडून दीक्षा घेतली होती. माझे लग्न नातेवाईकांमध्येच झाले. त्या घरी खुप दुःख होते, कारण की मला संतान प्राप्ती झाली नव्हती पण माझे पती माझ्यावर खुप प्रेम करीत असत. हळूहळू भांडण एवढे वाढले की माझे पती पण माझ्या विरुद्ध वागायला लागले आणि मामला घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचला. आमचा घटस्फोट झाला. आता मी खुप दुःखी झाले. माझे मन उदास झाले होते. आमच्या घराजवळ एक सत्संगी परिवार राहत होता. पती, पत्नी आणि दोन मुले. अचानक पत्नीचा मृत्यु झाला. माझ्या घरच्या माणसांनी थोड्या दिवसानंतर त्यांच्या नातेवाईकांचा सल्ला घेऊन माझे लग्न तिथे करून टाकले. हे कुटुंब खुप सुखी कुटूंब होते. मी लवकरच त्या मुलांत रमले आणि मुलेही मला सख्या आईपेक्षा जास्त प्रेम करू लागले. आमचे प्रेम आई मुलांचे झाले. माझ्या नवर्‍याने मला लेडी डॉक्टरकडे तपासासाठी नेले. डॉक्टरने स्पष्ट सांगितले की ही आई होऊ शकत नाही. मध्यंतरी आम्ही मोठ्या मुलाचे लग्नपण लावून दिले. आमच्या लग्नाला आता पाच वर्षे पुर्ण झाली होती. काही दिवसानंतर माझ्या पतीची पाटन्याला बदली झाली. ते मला सोबत घेऊन जाण्यास तयार होते. मला मुलांपासून दूर जाणे नको वाटत होते पण नाईलाज होता. जाण्याअगोदर मी महाराज दर्शनसिंहजींच्या जवळ गेले. माझे अश्रु निरंतर वहात होत. महाराजजींनी विचारले, काय झाले? मी म्हटले, महाराज मला आपल्या मुलांना सोडून जावे लागत आहे. त्यांच्या मनात कोणास ठाऊक काय होते? ते एकदम आपल्या मौजमध्ये म्हणाले, तू जा. महाराज जी आणखीन देतील’, त्यांचे वचन अटल होते. वेळ आल्यावर आमच्या घरी एका मुलीचा जन्म झाला. याप्रमाणे जगाने ज्या बाईला वांझ म्हटले होते, तिला दयाल पुरूष संत दर्शनसिंहजी महाराजांनी आईची पदवी मिळवून दिली. आज त्यांच्या आशिर्वादाने आमचे कुटुंब खुप सुखी आहे. काही क्लेश नाही, कोणतेही दुःख नाही, हे सर्व त्यांच्याच कृपेने शक्य झाले.

(कृपाल आश्रम, अहमदनगर)