जीवन चक्र- कर्म चक्र

0
74

तो असा विचार करतो की त्यांच्याशी त्याच्या इच्छेनुसार कसेही वागण्याचा त्याला अधिकार आहे. त्यांना मारतांना त्याला भिती वाटत नाही. ’जसे पेरतो, तसेच उगवते’ या सत्याकडे मनुष्य लक्ष देत नाही. नियमांच्या अज्ञानामुळे आपण त्यापासून मुक्त होऊ शकत नाही. प्रत्येक चुकीला शिक्षा आहे. जो म ारतो, त्याला मारले जाईल. जो तलवारीच्या बळावर जगतो, त्याचा विनाश तलवारीनेच होणार. डोळ्याच्या बदल्यात डोळा आणि दातांच्या बदल्यात दात. हा नियम सर्वांना लागू होतो जो आज ही तितकाच सत्य आहे जितका हजरत मुसाच्या काळात होता. कर्माचा हिशोब होईपर्यंत कितीही मौज मस्ती केली जाऊ शकते, परंतु आपण जर निसर्गाच्या नियम ांकडे दुर्लक्ष केले किंवा तंत्र-मंत्र, जादुटोणा यावर विश्वास ठेवला तर आपला काहीन फ़ायदा होणार नाही. दुसर्‍यांचे रक्त शोषणे आणि हत्येसारख्या गुन्ह्यांसाठी मोठी किंमत मोजावी लागते. दुसर्‍यांच्या कष्टावर जगणारे आणि शोषण रहिवासी यांचे 5 रोजी अल्पशा आजाराने झाले. त्यांच्यावर केडगाव येथील अमरधाममध संत्यसंस्कार करण्यात झाले. करून पोषण करणार्‍यांचे हृदय कधीच पवित्र होऊ शकत नाही. म्हणून त्याचे

प्रभुपर्यंत पोहचणे खूप कठिण आहे.

धन्य है वे लोग, जिनके हृदय पवित्र है,

क्योंकी वे ही प्रभुको देख पायेंगे । पवित्र बायबल (मत्ती 5:8)

संत महात्मा म्हणतात की सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याचे स्थान सर्वोच्च आहे, त्याच्याकडे बुद्धी – विवेकाची क्षमता आहे म्हणून त्याने आपले छोटेसे पण मौल्यवान आयुष्य इतर जीवांप्रमाणे अंधकारात घालवू नये. मनुष्य जीवन, परमात्म्याला शरण जाण्यास आणि आपल्या वास्तविक घरी परत जाण्याची सुवर्णसंधी आहे तिला व्यर्थ दवडू नये. जगाचा खेळ पुर्णपणे पाहिल्या नंतर आणि जगाच्या विशाल मंचावर सफलतापुर्वक आपली भुमिका निभावल्यानंतर ही सुवर्णसंधी आपल्याला मिळत असते. येथे मनुष्य नेहमी कमी दर्जाच्या आकर्षणात रमतो, असे केल्याने तो, शुद्ध आत्म्याच्या देशात जाण्याची एकमेव संधी गमावतो, जी त्याला कम र्ाच्या जबरदस्त प्रभावाखाली, अनंत योनीमध्ये जन्म घेतल्यानंतर प्राप्त होते. त्याला प्राकृतिक, सामाजिक आणि शारिरीक सर्व कायदे नियमांचा भार वाटू लागतो, जो विशाल शिळांच्या रूपात पावलो पावली त्याचा मार्ग रोखतो. परंतु त्याच्याजवळ पुढच्या मनुष्य जन्म ाची वाट पाहण्याशिवाय दुसरा मार्ग शिल्लक नसतो. कुणास ठाऊक तो त्याला कधी मिळणार ? संतांच्या मते पापाचा अर्थ आहे ’आपल्या स्त्रोतास (परमात्म्यास) विसरणे’. प्रत्येक विचार, वचन आणि कार्य जे मनुष्यास परमात्म्यापासून दूर करते ते पाप आहे. दुसर्‍या शब्दात जे काही मनुष्यास परमात्म्याजवळ आणते ते पवित्र किंवा पुण्य आहे. एका सुफी संताने जगाबद्दल आपले विचार व्यक्त करतांना म्हटले आहे, जग तेव्हाच मध्ये येते जेव्हा आपण परमात्म्यास विसरतो, आपल्या परिवार आणि मित्रांसोबत राहूनही जर मनुष्य नेहमी क्षणोक्षणी परमात्म्याचे स्मरण करील तर तो जगात राहूनही जगाचा नसतो.

(कृपाल आश्रम, अहमदनगर)