उंटाचा अतिशहाणपणा

0
64

एका गावातील सुताराने सुतारकाम येत नसल्याने उपजीविकेसाठी एक उंटिण खरेदी केली. नंतर त्या उंटिणीला एक पोर झालं. कौतुकाने सुताराने त्या पोराच्या गळ्यात घंटा बांधली. काही दिवसांनी उंटाचा व्यापार करण्यासाठी सुताराने आणखी उंट खरेदी केले. त्या व्यापारात सुताराचे बस्तान चांगले बसते. गळ्यात घंटा बांधलेला उंट सुताराचा लाडका असतो. पण हा उंट बाहेर चरताना कळपाबरोबर न राहता रमत गमत एकटा फिरायचा. तेव्हा बाकीच्या उंटांना वाटे की हा जंगलात असा एकटा फिरतो तर एखाद्या दिवशी वाघ-सिंह त्याला पकडतील. पण त्या उंटाने त्याकडे दुर्लक्ष केले. एके दिवशी सर्व उंट चरून घरी परतले तरी हा उंट जंगलातच रेंगाळत होता. त्याचवेळी एका सिंहाने त्याच्यावर पाळत ठेवली. त्याच्या गळ्यातील घंटेमुळे हा उंट लक्षात येई. त्या दिवशी काळोखात उंट वाट चुकला. पण सिंहाने घंटेच्या आवाजावरून अंदाज घेऊन त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला खाऊन टाकले.

तात्पर्य – शहाणपणाच्या उपदेशाकडे दुर्लक्ष केले तर जीवावर बेतू शकते.