अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश राज्य चिटणीसपदी अहिल्यानगरचे अनिल निकम यांना निवडीचे पत्र देताना मंत्री छगनराव भुजबळ
नगर – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारणीची बैठक नुकतीच नाशिक येथे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी राज्यातील विविध पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर करुन त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये अहिल्यानगरच्या अनिल निकम यांची प्रदेश राज्य चिटणीसपदी निवड करुन त्यांना नियुक्त पत्र छगनराव भुजबळ यांच्या हस्ते देण्यात आले. राज्यासह देशात अखिल भारतीय महात्मा
फुले समता परिषदेची ताकद अधिक वाढवण्यासाठी समता परिषदेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांनी जोमाने काम करावे. राज्यातील सर्व ओबीसींचे संघटन करून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्राधान्य द्यावे, यासाठी ही निवड करण्यात आली आहे. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ, कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, कार्याध्यक्ष दिलीप खैरे, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर तसेच स्वीय सहाय्यक रविभाऊ सोनवने, महेश आण्णा पैठणकर, सत्संग मुंडे, शंकरराव लिंगे, प्रचार प्रमुख मुकुंद सोनटक्के, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, सर्व समता परिषद प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.