कायनेटिक चौक येथे रिनॉल्ट डस्टर गाडीने अचानक पेट घेतला अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी वेळी दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला अग्निशमन पथकातील कर्मचारी शुभम गावडे, फायरमन अशोक
चितळे, युवराज रासकर, सागर जाधव, रोहन रासकर, आतेश भापकर.
नगर – नगर दौंड रोडने वाळकी कडून नगरकडे येणार्या डस्टर कार ने अचानक पेट घेतला. या आगीत कारचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही. ही घटना नगर पुणे रोडवरील कायनेटिक चौक येथे २ मार्च
रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. वाळकी येथून नगर कडे येणार्या चार चाकी डस्टर कारने (क्र. एम एच १६ ए एम ९३९३) कायनेटिक चौकात पुण्याकडे वळणार्या कॉर्नरवर अचानक पेट घेतला. गाडीने पेट घेताच वाहन
चालकाने प्रसंगावधान राखून गाडीच्या बाहेर उडी मारली. त्यामुळे तो बचावला. गाडीला आग लागताच घटनास्थळाजवळ असलेल्या नागरिकांनी गाडीकडे धाव घेतली. कोणीतरी अग्निशमन पथकास घटनेची माहिती कळविल्यानंतर
अग्निशामक दलाचा बंब तातडीने घटनास्थळी पोहोचला. अग्निशमन पथकातील शुभम गावडे, युवराज रासकर, सागर जाधव, अशोक चितळे, रोहन रासकर व अनेश भापकर यांनी पाण्याचा मारा करून आग आटोयात आणली. या आगीत
गाडीचे इंजिन जळाल्याने सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे अमोल रामदास गव्हाणे (रा. वाळकी, ता. नगर) यांनी सांगितले.





