शके १९४५ शोभननामसंवत्सर, मार्गशीर्ष शुलपक्ष, मूळ ०९|४७ सूर्योदय ०६ वा. २४ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.
राशिभविष्य
मेष : आर्थिक विषयांमध्ये आपले प्रयत्न आपणास यश मिळण्याचे कारण ठरतील. वरिष्ठ
अधिकार्यांकडून समर्थन मिळेल. आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने
शब्द वाढवू नका.
वृषभ : कला क्षेत्रात यश मिळण्याची शयता आहे. आपणास नवे वाहन मिळण्याची
शयता आहे. मानसन्मानात वाढ होईल. गुंतवणूक विचारपूर्वक करा.
मिथुन : एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीती भेट आपल्यासाठी आनंदाची ठरेल. धार्मिक
कार्यांमध्ये खर्च होण्याची शयता आहे. दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा
सहयोग मिळेल.
कर्क : आज आपणास कठोर श्रम करावे लागतील. काही निष्कारण चिंतांमुळे आपली
व्यग्रता वाढेल. विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग. आहारावर
विशेष लक्ष द्या.
सिंह : आपला जोडीदार आपणास भावनात्मक पाठबळ देईल. मित्रांमध्ये होणारे
वाद आपल्या संबंधासाठी वाईट ठरतील. मित्रांबरोबर वेळ जाईल.
कन्या : मानसिक स्थिती आल्हाददायक राहील व वरिष्ठांबरोबर संपर्कात आल्याने प्रसन्न
वातावरण राहील. आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल.
तूळ : आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. आरोग्याची काळजी
घ्या. व्यस्त राहाल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आय-व्ययमध्ये संतुलन राहील.
वृश्चिक : इतर लोकांना आपल्या स्वतः च्या आवश्यकता व इच्छा सांगण्यासाठी ही
उत्तम वेळ आहे. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा.
धनु : कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती संमिश्र
राहील. आळस करू नये, कामे वेळेत करण्याचा प्रयत्न करा.
मकर : आपल्या जुन्या लोकांबरोबर किंवा आधार देणार्या मित्रांना जोडणे या वेळी
आपल्यासाठी फलदायी ठरेल. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग.
कुंभ : एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध
वाढविण्याचा प्रयत्न करा.
मीन : चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या
व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मनावरील दडपण दूर.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.