मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
61

महर्षी दधिची आणि इंद्रवज

महर्षी दधीची हे ऋषी अथर्वन आणि त्यांची पत्नी चित्ती यांचे पुत्र होते. असे म्हणतात कि या अथर्वन ऋषींनी अथर्ववेद निर्माण केला. दधीची हे अत्यंत हुशार आणि देवभक्त होते. त्यांनी शास्त्रांचे अध्ययन करून प्रचंड ज्ञान मिळवले होते. एकदा ते क्षुप राजाने आयोजित केलेल्या वादविवादात पराभुत झाले. त्यामुळे व्यथित होऊन त्यांनी शिवाचे तप आरंभ केले. अनेक वर्षे तप केल्यानंतर शंकराने प्रसन्न होऊन त्यांना असा वर दिला: ते कधीही अपमानित होणार नाहीत त्यांना ईच्छामरण मिळेल त्यांचे शरीर अतिशय कणखर होऊन हाडे इंद्राच्या वज्राहूनही कठीण होतील. दधीची आनंदित झाले आणि आपल्या आश्रमात परतले. त्यानंतर पुन्हा कधीही वादविवादात ते पराभुत झाले नाहीत. काही वर्षांनी एक वृत्र नावाचा राक्षस लोकांना आणि देवांना त्रास देऊ लागला. नद्यांचे पाणी अडवुन सर्वांचं जगणं कठीण करू लागला. इंद्र हा पर्जन्यदेव (पावसाचा देव) आहे, त्यामुळे या राक्षसाचा बंदोबस्त करणे त्याला भाग होते. त्याने वृत्राशी युद्ध सुरु केले पण तो त्याला मारू शकला नाही. याचे कारण म्हणजे वृत्र राक्षसाला ब्रह्मदेवाकडून असे वरदान मिळाले होते कि त्याला लोखंड, लाकुड किंवा दगडाने बनवलेल्या कुठल्याही शस्त्राने मारता येणार नाही. सर्व शस्त्रांमध्ये यापैकी कशाचातरी वापर आवश्यक असतोच त्यामुळे त्याला मारणे अशयप्राय झाले होते. तेव्हा भगवान विष्णूंनी इंद्राला दधीची ऋषींची आणि त्यांना मिळालेल्या महादेवाच्या आशीर्वादाची आठवण करून दिली. देवांनी दधीची ऋषींना भेटुन त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. दधीची ऋषींनी ताबडतोब हे जाणले कि त्यांनी प्राण त्यागुन देवांना आपली हाडे दिली नाहीत तर वृत्र राक्षसाला मारता येणार नाही आणि सर्व सृष्टी धोयात येईल. जगाच्या कल्याणासाठी त्यांनी आपला प्राण लगेच त्यागला. मग देवांनी त्यांची हाडे वापरून इंद्रासाठी एक नवे वज्र आणि इतर शक्तिशाली शस्त्रे बनवली. ह्याच वज्राचा वापर करून इंद्राने वृत्र राक्षसाचा वध केला आणि सृष्टीवरचे संकट दूर केले.

बोध : कर्तव्य करत करतच आपले प्राण सोडणे म्हणजेच जींवनाचे सार्थक होय.