डाग होतील गायब

बटाट्याचा रस चेहर्‍याला
लावल्याने चेहर्‍यावरील डाग कमी होतात.
पण यामध्ये एक वस्तू नक्की मिस करावी.
बटाट्याच्या रसामध्ये मध मिस करुन
चेहर्‍याला लावावे. यामुळे त्वचा मॉइश्चराइज
आणि चमकदार होण्यास मदत होते.

धिरडे शिखरण

0

साहित्य : २ वाटी गव्हाचे पीठ,
चवीनुसार मीठ, थोडे तेल, केळ, साखर,
दूध, विलायची पूड
कृती : भांड्यात पीठ घेऊन थोडे तेल
घालून पाणी घालून सैलसर भिजवावे. गोळे
होऊ देवू नये. झाकण ठेवावे. १-२ तास
भिजून ठेवावे. करताना त्यात सोडा घालावा.
चांगले मिस करावे. तवा गरम करुन त्यावर
तेल पसरवून घ्यावे. १ पळी पीठ दोस्यासारखे
पसरवावे. दोन्ही बाजूने शेकावे. छान धिरडे
तयार. सोबत शिखरण खावे. अत्यंत सोपा
आणि पौष्टिक नाष्टा तयार.

तरीही वजन का वाढतेय…?

0

जतया कॅलरीज कमी केल्या आहेत
त्यापेक्षा जास्त पदार्थ खाल्लेत तर वजन वाढू
शकते. यासाठी कोणताही पदार्थ खाताना
त्याच्या कॅलरीज मोजा त्यानुसार व्यायाम
करुन आपण किती कॅलरीज बर्न करतो याचा
अंदाज घ्या आणि त्याप्रमाणे किती कॅलरीज
असणारे अन्नपदार्थ खावेत याची योग्य आखणी
करा

शिवद्रोही प्रशांत कोरटकर याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

अखंड मराठा समाज, जिजाऊ ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडीची निवेदनाद्वारे मागणी 

नगर – राष्ट्रपुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या नागापूर येथील शिवद्रोही प्रशांत कोरटकर याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला कठोर शासन करावे अशी मागणी अहिल्यानगर येथील अखंड मराठा समाज, मराठा सेवा संघ प्रणीत जिजाऊ ब्रिगेड तसेच वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

तिन्ही संघटनांनी दिलेल्या वेगवेगळ्या निवेदनात म्हंटले आहे की, नागपुर येथील प्रशांत कोरटकर या विक्षिप्त इसमांने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्या सोबत फोनवर झालेल्या संभाषणात राजमाता जिजाऊ, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचेबाबत अतिशय हिनदर्जाचे अवमानकारक तथ्यहीन वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे शिवद्रोही प्रशांत कोरटकर वर राष्ट्र‌द्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यास तात्काळ कठोर शासन करावे आणि त्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा अहिल्यानगर जिल्हा न्यायालय मध्ये चालवावा अशी मागणी अखंड मराठा समाज व सर्व शिवप्रेमी यांच्यावतीने करत आहोत.

अशा विकृत प्रवृत्ती असणाऱ्या इसमावर कडक कारवाई न झाल्यास जी काही गंभीर परिस्थिती उध्दभवेल त्या सर्व परिस्थितीस राज्य सरकार व अहिल्यानगर जिल्हा प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. शिवद्रोही प्रशांत कोरटकर यास योग्य ती अदल घडविण्यास अखंड मराठा समाज व शिवप्रेमी समर्थ आहेत असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. तर वंचित बहुजन आघाडीने या मागणी बरोबरच पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका बस मध्ये तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तातडीने अटक करून त्याचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा व त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही केली आहे. तसेच राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी केली.

यावेळी अखंड मराठा समाजाच्या शिष्टमंडळात सखाराम गुंजाळ, गोरक्षनाथ दळवी, दीपक खुळे,रामदास सातपुते, प्रशांत काळे, अलका कोरेकर, जिजाऊ ब्रिगेडच्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्षा अॅड. स्वाती जाधव व पदाधिकारी तर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष योगेश साठे, मारुती पाटोळे, प्रवीण ओरे, अमर निरभवने,विनोद गायकवाड, गणेश राऊत, राजीव भिंगारदिवे, दिलीप साळवे, जे.डी. शिरसाठ आदी उपस्थित होते.

फोटो ओळी – (अखंड मराठा समाज) शिवद्रोही प्रशांत कोरटकर याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देताना अखंड मराठा समाजाच्या शिष्टमंडळातील सखाराम गुंजाळ, गोरक्षनाथ दळवी, दीपक खुळे,रामदास सातपुते, प्रशांत काळे आदी.

फोटो ओळी – (जिजाऊ ब्रिगेड) शिवद्रोही प्रशांत कोरटकर याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देताना जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अॅड. स्वाती जाधव व पदाधिकारी.

फोटो ओळी – (वंचित बहुजन आघाडी) प्रशांत कोरटकर याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच पुण्यातील तरुणीवर अत्याचार करणाऱ्याला तातडीने अटक करावी या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, मारुती पाटोळे, प्रवीण ओरे, अमर निरभवने,विनोद गायकवाड, गणेश राऊत, राजीव भिंगारदिवे, दिलीप साळवे, जे.डी. शिरसाठ आदी

थकीत देयके त्वरित न मिळाल्यास सर्व विकासकामे थांबवण्याचा ठेकेदारांचा राज्य शासनाला दिला इशारा

जेसीबी, डंपर, रोड रोलर आडवे लाऊन अधीक्षक अभियंत्याचे कार्यालय आंदोलकांनी अडवले

नगर – विविध शासकीय निधीतून व योजनांची विकासकामे
करणार्‍या ठेकेदारांची हजारो कोटी रुपयांची थकबाकी राज्य
शासनाकडे वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. ही थकबाकी त्वरित अदा करावी,
या मागणीसाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहिल्यानगर शाखेच्या वतीने २७
फेब्रुवारी रोजी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता कार्यालयावर
धडक मोर्चा काढून मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम
विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयापासून निघालेला हा मोर्चा अधीक्षक अभियंता
कार्यालयात आल्यावर तेथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सहभागी सर्व ठेकेदार,
कामगार व कर्मचार्‍यांनी राज्य सरकारच्या निषेधाचे फलक हातात घेत घोषणा लिहिलेल्या
गांधी टोप्या घातल्या होत्या. राज्य शासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या तसेच ढोल
वाजवून राज्य शासनाच्या असहकार्याचा निषेध करण्यात आला. यावेळी जेसीबी, डंपर,
रोडरोलर आडवे लाऊन अधीक्षक अभियंत्याचे कार्यालय आंदोलकांनी अडवले होते.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नगर शाखेचे अध्यक्ष दीपक दरे यांच्या
नेतृत्वाखाली जिल्ह्यातून आलेले शासकीय ठेकेदार उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम
विभागाच्या अधिक्षक अभियंता भरत बाविस्कर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
त्यांनी राज्य शासनाकडे निधीसाठी मागणी केली असून, याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे
यांच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सांगितले.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष संजय गुंदेचा, राज्य सेक्रेटरी मिलिंद वायकर, जिल्हा
सेक्रेटरी उदय मुंडे, माजी अध्यक्ष अनिल कोठारी व महेश गुंदेचा, ज्येष्ठ सदस्य दादासाहेब
जगताप, जवाहर मुथा, दादासाहेब थोरात, अनिल तोरडमल, सुनील शिंदे, ईश्वर जंजिरे,
प्रितम भंडारी, बाळासाहेब मुरदारे, किरण पागिरे, शैलेश मेहेर, अनिश सोनीमंडलेचा,
बाळासाहेब कचरे, शिवाजी येवले आदींसह जिल्ह्यातून आलेले शेकडो ठेकेदार व हजारो
कर्मचारी कामगार या धरणे आंदोलनात व मोर्चात सहभागी झाले होते.
दीपक दरे म्हणाले, अहिल्यानगरमधील सर्व ठेकेदारांची गेल्या ३ वर्षांपासून केलेल्या
कामांची कोट्यावधी रुपयांची बिले राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. मात्र शासन केवळ
५ ते १० टक्के असा अल्प निधी देत आमची फसवणूक करत आहे. सर्व ठेकेदार मोठ्या
आर्थिक संकटात सापडले असून आमचे कामगारांवरही पगाराअभावी
उपासमारीची वेळ आली असून डांबर, खडी सप्लायरचे देणेही थकले
आहे. याच्या निषेधार्थ आम्ही आज शांततेत धरणे आंदोलन केले
आहे. आमचे प्रलंबित बिले जर त्वरित मिळाली नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन करणार
आहोत. या थकबाकीमुळे सुरु असलेल्या विकासकामांना एप्रिल २०२६ पर्यंत शासनाने
कोणताही दंड न आकारता मुदतवाढ द्यावी, अशीही मागणी आम्ही केली आहे.
अनिल कोठारी म्हणाले, शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्राम विकास, नगर
विकास खाते, जलसंपदा विभाग अशा सर्वच विभागांमध्ये सुरु असलेल्या विकासकामांचे बिले
गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहेत. सर्व ठेकेदार मोठ्या आर्थिक अडचणीत
सापडेल असून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने बँका आमच्यावर कारवाई करू लागल्या
आहेत. मात्र वारंवार मागणी करूनही शासन आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. याच्या निषेधार्थ
हे राज्यस्तरीय आंदोलन केले आहे. जर या राज्यस्तरीय आंदोलनाची शासनाने त्वरित दखल
घेतली नाहीतर लवकरच आम्ही रास्ता रोको सारखे आंदोलन करणार आहोत तसेच चालू
असलेले सर्व विकासकामे थांबवण्यात येणार आहेत, असा इशारा त्यांनी दिला

महाशिवरात्रीच्या पावन दिनी ध्यान धारणा व भजन संस्थेचा अनोखा संगम

केशर गुलाब मंगल कार्यालयात महाशिवरात्री निमित्त द मिस्टीक आय या संस्थेतर्फे भजन संध्या व ध्यान धारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

नगर – महाशिवरात्री या पावन दिनी भगवान शिवाची
आराधना केली जाते. शिव आराधनेमध्ये ध्यानाला खूप महत्त्व
आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण आणि भजन केल्यास
भगवान शिव प्रसन्न होतात. सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला जीवनात ताणय्तणाव जाणवतो. हा ताणतणाव दूर करण्यासाठी व मन शांती मिळविण्यासाठी ध्यान
धारण्याची आवश्यकता आहे. तसेच आपल्यामध्ये आलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट
करून सकारात्मक ऊर्जा मिळविण्यासाठी ध्यान धारणेचा चांगला फायदा मिळतो.
आज महाशिवरात्रीच्या पावनदिनी भजन संध्या कार्यक्रमातून भगवान शिवाची आराधना
करून भगवान शिवाशी एकरूप होऊन ध्यान साधनेतून सकारात्मक ऊर्जा प्राप्त
करून मनशांती मिळेल.
केशर गुलाब मंगल कार्यालयात महाशिवरात्री निमित्त द मिस्टीक आय या
संस्थेतर्फे भजन संध्या व ध्यान धारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नटराज पूजन व दिपप्रज्वलन करुन भजन संध्या व ध्यान शिबिराचे
उद्घाटन प्रमुख अतिथी लालचंद मुनोत, सौ. सुकांता मुनोत,
आनंदराम मुनोत, सौ.कमल मुनोत, द मिस्टिक आय च्या संचालिका
साक्षी मुनोत आदींच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भजन संध्येत शिवस्तुती, शिवतांडव, ऐ शिव भोले नाथ दिगंबर, ओम
नमः शिवाय हर हर भोले ओम नमः शिवाय, शिव शंभो महादेवा, हरहर गंगे या
भजनसंध्येच्या कार्यक्रमातून शिव आराधना करण्यात आली. यावेळी साधक भजनामध्ये
तल्लीन होऊन मंत्रमुग्ध झाले. भजन संध्येच्या कार्यक्रमात गायक सौ.गौरी सुद्रिक,
डॉ.वैष्णवी कुलकर्णी, शांभवी वळिंबे, राहुल ढोलरे, जीवन दुबे यांनी शिवस्तुती, शिव
तांडव, शिव भजने गायीली. तर यावेळी साथसंगत तबला वादक सुरज शिंदे, किबोर्ड
वादक प्रणव देशपांडे, रमेश कार्ले, गीटार वादक महेश कुलकर्णी व रुतीक देसाई यांनी
साथसंगत दिली. या कार्यक्रमाला अहिल्यानगरच्या नागरिकांनी प्रतिसाद दिला.

उत्कृष्ट शाखा पुरस्काराने ‘अहमदनगर सीए’ सन्मानित

नगर – अहमदनगर सीए शाखा आणि विद्यार्थी
शाखेला सर्वोत्कृष्ट शाखा पुरस्कार (लघु श्रेणी)
थखठउ तर्फे प्रदान करण्यात आला आहे. हा
पुरस्कार २०२४-२५ या वर्षासाठी जाहीर करण्यात
आला असून, मुंबईतील सहारा स्टार हॉटेल येथे
आयोजित कार्यक्रमात हा गौरव प्रदान करण्यात
आला. या प्रसंगी शाखा अध्यक्ष सीए सनित मुथा
आणि विद्यार्थी शाखा अध्यक्ष सीए प्रसाद पुराणिक
यांनी ही माहिती दिली.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ
इंडियाच्या (खउअख) पश्चिम विभागात महाराष्ट्र, गुजरात
आणि गोवा या राज्यांचा समावेश होतो. या विभागाच्या
वतीने मागील वर्षभरातील शाखांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून
उत्कृष्ट शाखा पुरस्कार दिला जातो. पश्चिम विभागाचे निवर्तमान
अध्यक्ष सीए अंकित राठी यांनी अहमदनगर सीए शाखेच्या उल्लेखनीय
कार्याची प्रशंसा करत या पुरस्काराची घोषणा केली.
अहमदनगर सीए शाखेने २०२४-२५ मध्ये सीए सदस्य आणि
विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक, व्यावसायिक आणि सांस्कृतिक
उपक्रमांचे आयोजन केले. सीए सदस्यांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र,
चर्चासत्रे, परिषदा, तसेच अनेक व्यक्तींच्या भेटी आणि मार्गदर्शन
यांसारखे उपक्रम घेतले गेले.
पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप,
उपजिल्हाधिकारी सुहास मापारी, राजेसाहेब माने, दीपक तावरे,
तसेच सामाजिक कार्यकर्त्या छायाताई फिरोदिया यांनी शाखेला,
आयसीएआयचे अध्यक्ष सीए रणजीतकुमार अग्रवाल आणि उपाध्यक्ष
सीए चरणज्योतसिंग नंदा भेट देऊन मार्गदर्शन केले.
शाखेने विविध विषयांवर सेमिनार्स आणि कार्यशाळांचे आयोजन
केले, ज्यामध्ये जिल्हा उपनिबंधक कार्यालय सोबत सहकारी
संस्था सहकारी बँका आणि पथसंस्था त्यांचे संचालक, अधिकारी
त्यांच्यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण, उठएऊअख सोबत ठएठअ
आणि ॠडढ वरील चर्चासत्र, चडचए आणि स्टार्टअप्सवरील संधी,
आयकर, ॠडढ, अख अधिवेशन, शेअर मार्केटवरील कार्यशाळा,
तिरुपती येथे प्रथमच परिषद, तसेच संपूर्ण भारतभरातील ५० हून
अधिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शन आणि
गुंतवणूक साक्षरता कार्यक्रम यांचा समावेश होता.
शाखेच्या पायाभूत सुविधांमध्येही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात
आल्या आहेत. नवीन वाचन कक्ष (ठशरवळपस ठेेा) सुरू करून
विद्यार्थ्यांना उत्तम अभ्यासाची सुविधा देण्यात आली
आहे. तसेच, पर्यावरणपूरक दृष्टीकोन ठेवत शाखेत
सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात आला आहे.
क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या, चार्टर्ड
अकाउंटंट्स प्रीमियर लीग (उअझङ) क्रिकेट
स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच सामाजिक
जबाबदारीच्या उपक्रमांतर्गत स्वच्छ भारत अभियान,
रक्तदान शिबिरे, दंतचिकित्सा शिबिरे आणि वंचित
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण यांसारख्या
उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या यशामध्ये २०२४-२५ साठीच्या अहमदनगर
सीए शाखेच्या व्यवस्थापकीय समितीचे योगदान
आहे. उपाध्यक्ष सीए प्रसाद पुराणिक, सचिव सीए अभयकुमार
कटारिया, खजिनदार सीए महेश तिवारी, तसेच माजी अध्यक्ष सीए
ज्ञानेश्वर काळे आणि सीए पवनकुमार दरक यांनी शाखेच्या उपक्रमात
मोलाची भूमिका बजावली आहे.
माजी अध्यक्ष सीए मोहन बरमेचा, सीए संजय देशमुख, सीए
अजय मुथा, सीए मिलिंद जांगडा, सीए सुशील जैन, सीए प्रसाद
भंडारी, सीए कुलकर्णी ज्ञानेश, सीए (डॉ.) परेश बोरा, सीए किरण
भंडारी आणि सीए संदीप देसरडा यांनीही मार्गदर्शन करून शाखेच्या
प्रगतीस हातभार लावला. अध्यक्ष सीए सनित मुथा यांनी संपूर्ण
नगर शाखेतील सर्व सीए सदस्य, विद्यार्थी, प्रशासकीय कर्मचारी,
कार्यकारिणी सदस्य, सदस्यांच्या कुटुंबीयांचे, विशेषत: त्यांचे कुटुंब
आणि पत्नी निकिता मुथा यांचे सहकार्याबद्दल आभार मानले.

श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज मठाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

१ हजार ३१३ अग्नि कुंडचा विक्रम केल्याने रेकॉर्डचे प्रमाणपत्र मठाधिपती अशोक दादा जाधव यांना सुपूत

नगर – केडगाव येथील श्रीमंत सद्गुरु शंकर
शेठ महाराज मठाच्या वतीने मठाधिपती अशोक
दादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त महायाग
करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या जास्तीत जास्त
अग्नि कुंडाचा विक्रम केला १७ नोव्हेंबर २०२४ रोजी
या यज्ञामध्ये एकूण १ हजार ३१३ अग्नि कुंड (हवन
कुंड) वापरण्यात आले असून याची रेकॉर्ड नोंद
करण्यात आली.
मोठ्या उत्साहात १ हजार ३१३ यजमानांच्या
हस्ते श्री दत्त महायागाचे आयोजन केले होते त्यामध्ये
१३ हजार भाविक उपस्थित होते व या महायागाची नोंद
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व
इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली
होती. त्याचे प्रमाणपत्र आज महाशिवरात्रीच्या दिवशी
देण्यात आले हे प्रमाणपत्र व मेडेल नॅशनल रेकॉर्ड बुक चे
निर्णायक अशोक अडक यांच्या हस्ते मठाधिपती अशोक
दादा जाधव यांना सुपूर्त करण्यात आले.
यावेळी मठाचे सेवेकरी व भाविक उपस्थित
होते. आज महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर
महायागाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये
मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. व मठाच्या
वतीने सद्गुरू शंकर महाराज जयंती व दत्त जयंती
उत्सव तसेच धार्मिक उत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात
साजरे करण्यात येतात.

बालरंगभूमी परिषदेच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

नगर – बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा अ‍ॅड. निलम शिर्के- सामंत ह्यांच्या प्रेरणेने येथील बालरंगभूमी परिषद
अहिल्यानगर शाखा आयोजित व कै.परीक्षित कुलकर्णी एज्युकेशन सोसायटी, राहुरी यांच्या वतीने
पिनॅकल लिनिक व डेंटल केअर यांच्या सहकार्याने शिबिरामध्ये मोफत तपासणी केली. बालरंगभूमी
परिषदेच्या या आरोग्य शिबिरास ५२ सभासदांनी प्रतिसाद देत ब्लड-शुगर, बी.पी., वजन, इ.सी.जी, दंत तपासणी
तसेच केस गळणे, त्वचेच्या आजारांवर तपासणी करून घेतली.
या वेळी डॉ.पुष्कराज कुलकर्णी यांनी निरोगी शरीरासाठी दिवसातला किमान १
तास करावयाचे विविध व्यायाम पद्धती व त्यांचे फायदे तर डॉ.प्रियंका कुलकर्णी यांनी
दात व हिरड्यांचे आरोग्य, त्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच
त्वचेचे आरोग्य आणि सौंदर्य यासाठी जीवनसत्त्वांचे महत्त्व यावर डॉ.राजे देशमुख यांनी
प्रश्नोत्तर माहिती देत सभासदांच्या शंकाचे निरसरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख कार्यवाह प्रसाद भणगे यांनी केले. तर आभार
मध्यवर्तीचे कार्यकारणी सदस्य अनंत जोशी यांनी मानले.
यावेळी विद्या जोशी, सोनाली दरेकर,सुजाता पायमोडे, टीना इंगळे, श्रिया
देशमुख, ऋतुजा पाठक, सतीश लोटके, विराज अडगटला, देवीप्रसाद सोहोनी, सागर
अलचेट्टी, प्रशांत सूर्यवंशी, अविनाश बोधले, तेजस अतितकर, राहुल रसाळ, अनिल
जोशी, रघुनाथ सातपुते, महादेव गाडे, मंगेश जोशी, निलेश बागडे, देवीप्रसाद सोहनी
आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्षा उर्मिला लोटके यांसह शिबिर
प्रमुख शैलेश देशमुख व तेजा पाठक यांनी प्रयत्न केले.

‘आनंदऋषीजी हॉस्पिटल’ येथे १ ते ३१ मार्चपर्यंत मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

अँजिओग्राफी ३ हजार, सिटी स्कॅन १२५० रुपयांत, एमआरआय २५०० रुपयात व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया

नगर – आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित श्री
आनंदऋषीजी हॉस्पिटल अ‍ॅण्ड हार्ट सर्जरी सेंटर येथे १ ते ३१ मार्च या कालावधीत विविध मोफत आरोग्य तपासणी
शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांची मानवसेवेची शिकवण व प्रबुध्द
विचारक आदर्शऋषीजी म.सा.यांच्या प्रेरणेतून हे शिबिर घेण्यात येत आहेत. दररोज सकाळी १० ते दुपारी २ या
कालावधीत रूग्ण तपासणी करण्यात येणार आहे. दरवर्षी राबविण्यात येणार्‍या या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा
लाभ असंख्य रूग्णांना झाला आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलला एन.ए.बी.एच.मान्यता मिळालेली असून, ही मान्यता असलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील २६० बेडस्चे हे पहिलेच हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमधील उच्च दर्जाच्या आरोग्य सेवांचा लाभ
या मोफत शिबिरांतून सर्वसामान्य रूग्णांना होणार आहे. हॉस्पिटलमध्ये एमआरआय तपासणी २५०० रुपये, सर्व
प्रकारचे सिटी स्कॅन १२५० रुपये, सोनोग्राफी कलर प्रिंट व रिपोर्टसह ८०० रुपये, डिजीटल एस रे तपासणी
२५० रुपयात केली जाणार आहे. हॉस्पिटलमध्ये प्रशस्त व अतिप्रगत पॅथॉलॉजी विभाग, आंतरराष्ट्रीय दर्जाची ब्लड
बँक, ३५ डायलेसिस मशिन कक्ष, परिपूर्ण फिजिओथेरपी विभाग आहे. या विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिराला
१ मार्च रोजी सुरूवात होणार आहे. पहिल्या दिवशी एंडो युरोलॉजीकल (मूत्रपिंड, मूत्रमार्ग, मूत्राशय), स्टोन तपासणी
व शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. प्रोस्टेट रोग उपचार, युरेथ्रल स्ट्रीचर रोग व्यवस्थापन, पुरूष वंध्यत्व समुपदेशन,
अंडाशय कर्करोग व्यवस्थापन आदी उपचार केले जातील. रूग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया
केल्या जाणार आहेत. शिबिरात मूत्र विकार तज्ज्ञ डॉ. संकेत काळपांडे व डॉ. अमय सांगळे रूग्ण तपासणी व
उपचार मार्गदर्शन करतील. ७ मार्च रोजी प्लॅस्टिक सर्जरी शिबीर होणार आहे.
यात लहान मुलांच्या हाताच्या जन्मजात समस्या, व्यंग, मधुमेहामुळे होणार्‍या जुनाट जखमा, पायाच्या जखमा,
दुभंगलेले ओठ, तुटलेले कान, चेहर्‍यावरील व्रण, तोंड, गाल, ओठ, जीभ, जबडा, सायनस, लाळ ग्रंथीच्या साध्या
व कर्करोगाच्या गाठीचे निदान व उपचार मार्गदर्शन केले जाईल. तिखट आणि मसालेदार खाण्यात अडचण येणे,
तोंडातील व्रण आदी समस्यांवर उपचार केले जाणार आहेत. प्लॅस्टिक सर्जन डॉ.माया मरकड व डॉ. दमाणी आदित्य
शिबिरात तपासणी व उपचार करणार आहेत. ९ मार्च रोजी मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर होणार
आहे. महावीर भवन येथील आनंदऋषीजी नेत्रालय येथे होणार्या या शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया,
रेटिना तपासणी व शस्त्रक्रिया, तिरळेपणा, लहान मुलांचे मोतीबिंदू तपासणी होईल. नेत्रतज्ज्ञ
डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ.अशोक महाडिक, डॉ.संदीप राणे, डॉ. कटारिया, डॉ. तांबे, डॉ.शिंदे, डॉ.
भराडिया आदी तज्ज्ञ डॉटरांची टीम रूग्ण तपासणी व उपचार करतील. शिबिराच्या नाव नोंदणीसाठी संपर्क
-८६८६४०१५१५. १० मार्च रोजी बालरोग तपासणी शिबीर होणार आहे. यात लहान मुलं, नवजात शिशुंचे आजार आणि तपासणी, लहान मुलांच्या हर्निया, हायड्रोसील, फिमोसिस, ंडिसेंड टेस्टीस इत्यादी शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. बालरोग तज्ज्ञ डॉ. श्रेयस सुरपुरे, डॉ.वैभवी वंजारे, डॉ.सोनाली कणसे, पिडियाट्रीक सर्जन डॉ. रूपेश सिकची रूग्ण
तपासणी करतील. १३ मार्च रोजी मेंदू विकार व मेंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात डोकेदुखी, अपस्मार, पॅरालिसिस, कंबरदुखी, नसांचे विकार, स्नायूंचे विकार, मेंदूतील जंतुसंसर्ग, मेंदूज्वर, स्मृतीभ्रंश इत्यादी आजारांची
तपासणी व उपचार केले जातील. इ.इ.जी, इ.एम. जी, एन.सी.व्ही इत्यादी तपासण्या ५० टक्के सवलतीच्या
दरात केल्या जाणार आहेत. मणयातील चकती सरकणे, झटके येणे, ट्रॉमा सर्जरी, मेंदूतील रक्तस्त्राव, स्लिपडिस
आदी समस्यांवर उपचार शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. मेंदूविकार तज्ज्ञ डॉ.गौतम काळे, डॉ.अद्वैत गिते, न्यूरोसर्जन
डॉ.विशाल भस्मे रूग्ण तपासणी करतील. हॉस्पिटल मध्ये दर महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या गुरूवारी डॉ.विशाल
भस्मे उपलब्ध असतात. १६ मार्च रोजी हृदयरोग तपासणी शिबीर होणार आहे. यात ंजिओग्राफी तपासणी ३ हजार रुपयांत केली जाणार आहे. हृदय शस्त्रक्रिया हृदयातील झडप बदलणे, छिद्रे बुजवणे, लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया व अँजिओप्लास्टी महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत केल्या जाणार आहेत. शिबिरात कार्डियाक सर्जन डॉ.स्वप्नील
कर्णे, डॉ.श्रीरंग रानडे, डॉ.इमरान पटेल, डॉ. देखणे, डॉ. आवस्ती, एम डी मेडिसीन डॉ.वसंत कटारिया, डॉ. चिंधे,
कार्डिओलॉजीस्ट डॉ.राहुल अग्रवाल, डॉ.अमित थोपटे, डॉ .अनिकेत कटारिया, कार्डियाक अनेस्थेटिस्ट डॉ.राहुल
एरंडे, डॉ.विनय छल्लाणी, डॉ.गजेंद्र गिरी, डॉ.रविराज गवळी, डॉ.प्राजक्ता पारधे रूग्ण तपासणी करतील.
१८ मार्च रोजी सवलतीच्या दरात जनरल शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पेंडिस व
इंगवायनल हर्निया शस्त्रक्रिया प्रत्येकी १० हजार रुपये, हायड्रोसील शस्त्रक्रिया ४ हजार रुपयांत केली जाणार आहे.
औषध खर्च वेगळा असेल. जनरल सर्जन डॉ. प्रविण मुनोत, डॉ.विवेक भापकर रूग्ण तपासणी करून उपचार मार्गदर्शन करतील. २० मार्च रोजी स्त्रीरोग, गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबीर
होणार आहे. यात दुर्बिणीव्दारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, गर्भाशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया, सिझेरियन प्रत्येकी १० हजार रुपयात केले जाईल. गर्भवती मातांची सोनोग्राफी, रक्त, लघवी इत्यादी तपासण्या शिबिरापासून पुढील महिनाभराच्या कालावधीत ५० टक्के सवलतीच्या दरात केल्या जातील. शिबिरातील गर्भवती मातांना बाळंतपणावेळी होणार्‍या फीमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रवींद्र मुथा, डॉ.सोनल बोरुडे रूग्ण
तपासणी करतील. २२ मार्च रोजी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात ब्लड प्रेशर, मधुमेह व इतर विविध आकारांची तपासणी व उपचार मार्गदर्शन केले जाईल. तज्ज्ञ डॉ. वसंत कटारिया, डॉ. गजेंद्र गिरी, डॉ.
रविराज गवळी, डॉ.प्राजक्ता पारधे रूग्ण तपासणी करणार आहेत. २४ मार्च रोजी कॅन्सर तपासणी शिबीर होणार आहे. यात घसा, फुफ्फुस, आतडे, तोंडाचा इत्यादी कॅन्सर तपासणी, स्त्रियांचे कॅन्सर तपासणी, स्त्रियांमधील स्तनाच्या कॅन्सरची
तपासणी मॅमोग्राफी मशिनव्दारे करण्यात येईल. स्त्रियांच्या गर्भ पिशवीच्या कॅन्सरच्या तपासणीसाठी सवलतीच्या दरात
पॅपस्मीयर तपासणी केली जाणार आहे. मॅमोग्राफी तपासणी फक्त १०० रुपयात करण्यात येणार आहे. या शिबिरात
कॅन्सर सर्जन डॉ. अनिकेत शिंदे, डॉ. राहुल कांडेकर, कॅन्सर विकार तज्ज्ञ डॉ.लिझा बलसारा, फिजिशियन डॉ. गिरी,
डॉ.गवळी, डॉ. पारधे, सर्जन डॉ.विवेक भापकर, डॉ.प्रविण मुनोत, डॉ. भास्कर जाधव, डॉ. आर.एम. पांडे, स्त्री रोग
तज्ज्ञ डॉ.रवींद्र मुथा, डॉ.सोनल बोरुडे, रेडिओलॉजीस्ट डॉ. मितेश कटारिया, डॉ.भक्ती फलके, डॉ.सोनाली सोलट,
डॉ.निखिता जैन (कटारिया), पॅथॉलॉजी डॉ.मुकुंद उंडे, डॉ. सारिका झरेकर, मायक्रोबायोलॉजीस्ट डॉ.नरेंद्र पाटील रूग्ण
तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. २५ मार्च रोजी अस्थिरोग तपासणी, मणके व सांधेबदली शस्त्रक्रिया शिबीर होणार आहे. यात इंपोर्टेड इम्प्लांटसह संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण, संपूर्ण खुबा प्रत्यारोपण इंपोर्टेड इम्प्लांटसह ६५ हजार रुपयांपुढे केले जाणार आहे. औषध खर्च वेगळा असणार आहे. यासह ए.सी.एल., रि कन्स्ट्रशन व ऑर्थोस्कोपी निदान केले जाणार आहे. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनोंतर्गत पात्र लाभार्थींच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. शिबिरात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.विशाल शिंदे, डॉ. रोहन धोत्रे, स्पाईन सर्जन डॉ. अमित सुराणा, डॉ. अक्षय गादिया रुग्ण
तपासणी करणार आहेत. २६ मार्च रोजी किडनी आजार तपासणी शिबिर होणार आहे. यात अंगावर सूज येणे, लघवी कमी अथवा लाल होणे, किडनी जंतू संसर्ग, डायलेसिस रूग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. महात्मा ज्योतीबा फुले
जनआरोग्य योजनेंतर्गत डायलेसिस मोफत केले जाईल. यात नेफ्रोलॉजीस्ट डॉ.गोविंद कासट, डॉ.प्राजक्ता पारधे
रूग्ण तपासणी करतील. २७ मार्च रोजी कान, नाक, घसा व स्पीच थेरपी तपासणी शिबीर होणार आहे. हॉस्पिटल मध्ये ऑडिओमेट्री  सुविधा उपलब्ध आहे. या शिबिरात डॉ.सुकेशिनी गाडेकर, डॉ. अतुल तुपे, वाचा व भाषा उपचार तज्ज्ञ अझर शेख रूग्ण तपासणी करणार आहेत. २९ मार्च रोजी दंतरोग तपासणी व उपचार शिबीर होणार आहे. यात दातांच्या नसावरील उपचार मेटल कॅप १ हजार ते १५०० रूपये रुपये, सिरॅमिक कॅप १५०० ते २५०० रुपये, रुट कॅनल २००० ते ३ हजार रुपये, दातांची कवळी बसवणे ८ ते १४ हजार दरम्यान, दात साफ करणे, दातात सिमेंट भरणे प्रत्येकी ५०० रुपये, दात काढणे आदी उपचार केले जाणार आहेत. दंतरोग तज्ज्ञ डॉ. अपर्णा पवार, डॉ.प्राची गांधी, लहान मुलांचे दंतरोग तज्ज्ञ
डॉ.प्रणव डुंगरवाल, ओरल सर्जन डॉ. स्वराज ठोले, डॉ. मृदुला मुळे शिबीरात उपचार करतील.
३० मार्च रोजी त्वचा रोग तपासणी शिबीर होणार आहे. मुरुम, पांढरे डाग, इसब, गजकर्ण, नायटा, केसांच्या,
नखांच्या समस्या, सोरियासीस, चामखीळ, कुष्ठरोगावरील तपासणी व उपचार करण्यात येतील. त्वचारोग तज्ज्ञ
डॉ.भास्कर पालवे, डॉ.अमित शिंदे रूग्णांची तपासणी व मार्गदर्शन करतील. शिबिराची वेळ सकाळी १० ते २ व
दुपारी ३ ते ५ असणार आहे. ३१ मार्च रोजी शिबिरांची सांगता दुर्बिणीद्वारे बिनटाका
शस्त्रक्रिया शिबिराने होणार आहे. यात लॅप्रोस्कोपीव्दारे
पोटातील, बेंबी, हर्नियाची शस्त्रक्रिया १० हजार रुपये,
पित्ताशय काढणे शस्त्रक्रिया १५ हजार रुपये, स्त्रियांच्या
गर्भाशयाची पिशवी काढणे १० हजार रुपये, स्टॅपलर लेझर
पाईल्स शस्त्रक्रिया १५ हजार रुपये, अपेंडिस शस्त्रक्रिया ४
हजार रुपये, स्त्रीयांचे वंध्यत्व तपासणीसाठी ट्युबल पेटेन्सी
टेस्ट २ हजार रुपये, स्त्रीयांची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया ३
हजार रुपयांत केली जाईल. या शस्त्रक्रियांसाठी औषधे,
जाळीचा व इतर खर्च वेगळा असेल. या शिबिरात जनरल व
लॅप्रोस्क्रोपिक सर्जन डॉ.भास्कर जाधव, डॉ. आर.एम. पांडे,
डॉ. राहुल कांडेकर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रवींद्र मुथा, डॉ.सोनल
बोरुडे रूग्ण तपासणी करतील.
नाव नोंदणी माहितीसाठी ०२४१-२३२०४७३/७४/७५
यावर संपर्क साधण्याचे आवाहन जैन सोशल
फेडरेशनच्यावतीने करण्यात आले आहे.