लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ६० हजारांच्या रोकडसह तिघांना पकडले

0
36

 

 

नगर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ६० हजारांची रोकड जवळ बाळगल्या
प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टेशन
रोडवरील एका हॉटेल मध्ये पोलिसांनी सोमवारी (दि.२९) सायंकाळी ही कारवाई केली
आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही जण मोठी रोकड बाळगून असल्याची
माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. या माहिती वरून पोलिसांनी एका हॉटेल
मधील रूम मध्ये जावून तपासणी केली असता तेथे ६० हजारांची रोकड आढळून आली.
त्यामुळे पो.कॉ. सतीश शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राहुल बबन झावरे (रा.पारनेर),
अनिकेत राजु यादव (रा. भिंगार), विलास गोविंद चिवडे (रा.मुंबई) यांच्या विरुद्ध भा.दं.
वि.कलम १८८, १७१ (ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे.