अर्हम पुरुषाकार ध्यान ७२ तासांचे शिबीर २६ एप्रिलपासून चिचोंडी शिराळ येथे सुरू

0
10

नगर – राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंदऋषीजी महाराजांचे सुशिष्य अर्हम विज्जा प्रणेता उपाध्याय श्री प्रविणऋषीजी महाराजांचे एक क्रांतीकारी अभियान अर्हम पुरुषाकार ध्यान साधना या साधेनेचे ७२ तासांचे म्हणजेच ३ दिवसीय शिबीर चिचोंडी (शिराळ) येथे नवनिर्मित होत असलेल्या गुरू आनंद तीर्थच्या प्रांगणात, निसर्गरम्य परिसरात होत आहे. तप्त शरीराला थंडावा देण्यासाठी लोक हील स्टेशनला जातात परंतु तप्त मनाला थंडावा द्यायचा असेल तर चिचोंडीतील हे शिबीर अतिशय उपयुत आहे. आजच्या या धकाधकीच्या, धावपळीच्या स्पर्धेच्या, यांत्रीक जीवनशैली झालेल्या आजच्या युगात व्यक्ती मनाने थकत चालला आहे. वाढलेले मानिकस ताण, नात्यांमधील संपत चाललेले प्रेम मानसिक व्याधींना आमंत्रण देत आहेत व विज्ञान हेच सांगते की मानसिक असंतुलनामुळे शारिरीक व्याधी निर्माण होतात. मानसिक असंतुलनामुळे शरीरातील हार्मोन, रसायनांमुळे बदल घेतो हा बदल रक्तात उतरुन इंद्रियापर्यंत पोहोचतो व शारीरिक विकाराला सुरुवात होते, बाह्य जागाला घटनेला आपण बदलु शकत नाही मात्र आजच्या जगात जगण्यासाठी आपल्या मनाला समर्थ बनवून शारीरिक स्वास्थ्य प्राप्त करू शकतो. हेच या शिबीराचा उद्देश आहे. आजपर्यंत अर्हम पुरुषाकार ध्यान साधनेद्वारे हजारो-लाखो लोक सर्दीपासून कॅन्सर, डायबेटीस, किडनी विकारामध्ये रिलीफ मिळवत आहे. सर्वांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, याच पेपरमध्ये या शिबीराची जाहिरात आहे. त्यातील टठ उेवश डलरप करुन नाव रजिस्टर करा जास्त माहितीसाठी संपर्क ९९२१६२९५५०, ७५८८३५८९७९.