शिबिरातून शिकविले जाणारे संस्कारमूल्य आत्मसात करावेत : हेरंब कुलकर्णी

0
83

रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती व राष्ट्र सेवा दल आयोजित संस्कार शिबीराचे उद्‌घाटन 

नगर – तुम्ही सर्वजण साने गुरूजींचे विचार आचरणात आणावेत, शिबिरातून शिकविले जाणारे संस्कार मुल्य आत्मसात करावेत. लहान वयातच मुलांवर योग्य संस्कार होणे ही काळाची गरज बनली आहे. मोबाईलच्या मोहजालातून बाहेर काढण्यासाठी मुलांसाठी असे शिबीर नियमित आयोजित केले पाहिजे, असे सांगून हेरंब कुलकर्णी यांनी युग निर्माता ‘हम बच्चे कल की आशा हम बच्चे’ हे गीत मुलांकडून म्हणून घेतले. सालाबाद प्रमाणे यावर्षी रावसाहेब पटवर्धन यांच्या विचारधारेच्या अनुषंगाने रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती व राष्ट्र सेवा दल अहमदनगर यांच्यावतीने १४ ते २६ एप्रिल दरम्यान बालसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबीराचे उदघाटन स्मारक समितीचे ज्येष्ठ विश्वस्त विजयराव सावंत यांचे अध्यक्षतेखाली झाले. समितीचे सचिव अ‍ॅड.रविंद्र शितोळे म्हणाले, या शिबीरामध्ये मनोरंजनाबरोबरच मुलांना संस्कारक्षम शिक्षण ़हसत खेळत व्यवहारज्ञाऩ व व्यवसाय मार्गदर्शऩ जीवनाच्या विविध अंगाना स्पर्शून जात असलेल्या विषयांची ओळख़, देशभक्तीपर गीते, समरगीत, प्रेरणागीते, ़बडबड गीत, ़श्रमांची प्रतिष्ठा सांगणारी गाणी, अंधश्रध्दा निर्मूलनाची गीते आणि स्फूर्तीगीतांच्या माध्यमांतून बालमनाचे सांस्कृतिक परिवर्तन घडविण्याचा हा संस्कारवर्ग असल्याचे सांगून त्यांनी समिती राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती सांगितली.

मागीलवर्षी शिबीरात सहभागी झालेले पैकी स्वरा व अर्पिता यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे पालकांपैकी लासुरे ताई व बोठे सर यांनी शिबीरातील उपक्रमांचे कौतुक करून आपले मत व्यक्त केले. समितीच्या उपाध्यक्षा शोभा ढेपे यांनी शिबीरात मुला-मुलींना पाठविल्याबद्दल पालकांचे मनापासुन आभार मानले. संस्कार मुल्यांबरोबरच स्मरणशक्तीचे विविध खेऴ, लेझीम, सुर्यनमस्काऱ, योगासने, विविध विषयतज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने व प्रात्यक्षिक कार्यशाळा, ़ व्यक्तिमत्व विकास, संस्कारक्षम अशा कथामालेच्या माध्यमातून गोष्टी प्रतिज्ञा व संविधानाचे अभिवाचन आणि पथनाटय प्रशिक्षण इत्यादी बाबींचा सुध्दा या शिबीरात समावेश करण्यात आलेला आहे, अशी माहिती शिबीर प्रमुख शिवाजी नाईकवाडी यांनी सांगितली. अध्यक्षीय मनोगतात विजयराव सावंत यांनी सर्व शिबीरार्थी यांना शुभेच्छा दिल्या. हे शिबीर पुढील तेरा दिवस रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती, भिस्तबाग रोड़, सावेडी़, अहमदनगर येथे हा संस्कारवर्ग होणार असून वर्गाची वेळ दररोज सकाळी ७.३० ते १२.३० व सायं.४.३० ते ७.३० अशी असेल, असे सांगितले. यावेळी स्मारक समितीच्या उपाध्यक्षा सौ.शोभा ढेपे, ़शिबीर संयोजक व सचिव अ‍ॅड.रवींद्र शितोळे, ़विश्वस्त सर्वश्री गणेश गावडे, दत्तात्रय जंगम, विजयराव सावंत, सुहास अंतरकर, जगन्नाथ गुंड तसेच सेवा दलाचे कार्यकर्ते दत्ता दिकोंडा, पुरूषोत्तम जाधव, बापू जोशी, अरूण आहेर, विवेक पवार आदी उपस्थित होते. शेवटी आभार सेवा दलाचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष पुरूषोत्तम जाधव यांनी केले. शिबीर प्रमुख व सुत्रसंचलन माणुसकीचे दुत शिवाजी नाईकवाडी यांनी केले.