केडगावमध्ये भरदिवसा फ्लॅट फोडून रोकड लांबविली

0
29

नगर – केडगाव उपनगरातील आदेश हाईट्स, दूधसागर सोसायटी येथील फ्लॅट फोडून कपाटाच्या लॉकरमधील २५ हजाराची रोकड चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि. १७) सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० दरम्यान ही घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत ज्ञानदेव मुनफन (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सकाळी ८ वाजता कामावर गेले होते तर त्यांच्या पत्नी सकाळी साडेनऊ वाजता फ्लॅट बंद करून मुलाला घेऊन माहेरी तांदळी वडगाव (ता. नगर) येथे गेल्या होत्या. त्या दुपारी साडेचार वाजता घरी आल्या असता त्यांना फ्लॅट फोडलेला दिसला. त्यांनी पाहणी केली असता कपाटातील लॉकरमधील २५ हजारांची रोकड चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी भरत मुनफन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.