खरेदीच्या बहाण्याने कापड दुकानात आलेल्या तीन महिलांनी चोरल्या १५ महागड्या साड्या

0
42

नगर – नगर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या तरुणाच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना कापडबाजाराजवळील मोची गल्ली येथे घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुरुवारी (दि.९) कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. याबाबत समर्थ अनिल मोहिते (वय १९, रा. भूषणनगर, केडगाव) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी समर्थ हा मंगळवारी (दि.७) सायंकाळी ५.३० च्या सुमारास खरेदीसाठी नगरमध्ये बाजारपेठेत आलेला होता. तो मोची गल्लीत गेला त्यावेळी तेथे मोठी गर्दी होती. या गर्दीतून जात असताना अज्ञात चोरट्याने समर्थ याच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरली. खरेदी करून घरी गेल्यावर चोरीची घटना त्याच्या निदर्शनास आली. त्यानंतर गुरुवारी (दि.९) दुपारी त्याने कोतवाली पोलीस ठाण्यात येवून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भा.दं. वि. कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.