‘प्रवेश बंदी’ असतानाही नगर शहरात आलेल्या तरुणावर पोलिसांची कारवाई

0
50

नगर – शिवजंयती उत्सवानिमीत्त प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून नगर शहरात प्रवेश करण्यास बंदी घातलेल्या तरुणाने हा आदेश डावलून सोमवारी (दि.१९) शहरात आलेल्या महेश सुरेश दळवी (रा. बुर्‍हाणनगर) याला कोतवाली पोलीसांनी पकडून त्याच्यावर कारवाई केली आहे. शिवजयंती उत्सव शांततेत व व्यवस्थीत पार पडावा या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतून उपविभागिय दंडाधिकारी नगर भाग यांचेकडील आदेशानुसार क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम १४४ अन्वये एकुण ९८ इसमांना रविवारी दि.१८) मध्यरात्री पासून मंगळवारी (दि.२०) सकाळी ७ वाजेपर्यंत नगर शहर व भिंगार हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. मात्र सोमवारी (दि.१९) सकाळी शिवजयंती मिरवणुक चालु असताना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना अज्ञात नागरीकांने फोन व्दारे संपर्क करुन महेश सुरेश दळवी हा शहरामध्ये फिरत आहे अशी माहीती दिली. ही माहिती मिळताच त्यांनी स.फौ. राजेंद्र गर्गे, पो. कॉ.याकुब सय्यद, पो.हे.कॉ. ज्ञानेश्वर मोरे व होमगार्ड आजबे यांना कारवाई साठी पाठविले. त्यांनी महेश दळवी यास मार्केट यार्ड भागात पकडले आहे.