शाळा, महाविद्यालयाला जोडणाऱ्या रस्त्याची खड्‌ड्यांमुळे मोठी दुरावस्था

0
42

दररोज अपघात होऊन विद्यार्थी, पालक होताहेत जखमी

शाळा, महाविद्यालयाला जोडणार्‍या रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली दूरावस्था.

नगर – कॅन्टोन्मेंट हद्दीतील अहमदनगर पंडित जवाहरलाल नेहरू, कॉन्व्हेंट, केंद्रीय विद्यालय या तीन प्रमुख शाळा तसेच भारतीय आयुर्विमा महामंडळाचे कार्यालय असलेलला रस्ता अपघाती ठिकाण बनलेला आहे. गेल्या तीन ते चार वर्षापासून सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले असून शाळेतील विद्यार्थी पालक वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक या खड्ड्यात पडून दररोज जखमी होत आहे. छावणी मंडळाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे परिसरात अपघाताची जणू मालिका सुरू झाली आहे. याच रस्त्यावरून सकाळी शेकडो लोक जॉगिंगसाठी ये-जा करतात. परंतु छावणी मंडळाच्या एकही सदस्याला सदर रस्त्याची दुर्दशा दिसली नाही याचे नवलच वाटते. वास्तविक पंधरा दिवसांपूर्वीच भिंगार मध्ये खड्डे वाचविताना एका निरपराध प्राचार्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावरून ही छावणी मंडळाला जाग येत नाही याचे मोठे दुःख वाटते. या शाळा, विद्यालयाचा रस्ता त्वरित पॅचिंग करण्यात यावा. अन्यथा समाजवादी पार्टी विद्यार्थी व पालकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन उभारेल, असा इशारा पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन यांनी छावणी मंडळ प्रशासनाला दिला आहे.