‘बंद’ रस्ता खुला करण्यासाठी घोषणाबाजी करत माजी सैनिक कुटूंबातील महिलांनी केली ‘निदर्शने’

0
50

जिल्हाभरातून शेकडो माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय पाचव्या दिवशीही उपोषणात सहभागी

नगर – शहराजवळील दरेवाडी परिसरातील लष्कराच्या हद्दीतील स्थानिक रहिवाशांच्या दळणवळणाचा बंद केलेला नगरवाला रस्ता पुन्हा खुला करावा, या मागणीसाठी आजी-माजी सैनिकांसह स्थानिक रहिवाशांनी जामखेड रोडवरील लष्कराच्या स्टेशन हेड१ॉर्टरसमोर शनिवारपासून (दि. १६) आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा सलग पाचवा दिवस असून, बुधवारी (दि. २०) सैनिक महासंघाच्या राज्य महिला अध्यक्षा पुष्पाताई मुंढे (औरंगाबाद) या उपोषणस्थळी दाखल झाल्या. यावेळी जिल्हाभरातून माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय या आंदोलनात उतरले आहेत. मुंढे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत स्टेशन हेड१ॉर्टरसमोर निदर्शने केली. अद्यापपयरत एकाही लष्करी अधिकार्‍याने उपोषणकत्यारशी चर्चा केलेली नाही. रस्ता खुला न झाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढणार असल्याचा इशारा उपोषणकत्यांनी दिला आहे. दरेवाडी परिसरासह हरिमळा, वाकोडी येथील स्थानिक रहिवाशांचा नगरवाला रस्ता हा दळणवळणाचा प्रमुख रस्ता आहे.परंतु लष्करी अधिकार्‍यांनी सदर रस्ता गेट लावून बंद केला आहे. त्यामुळे शाळेत जाणारी मुले, दवाखान्यात जाणारे रुगण तसेच स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

हरिमळा परिसरात ३०० ते ४०० माजी सैनिक तसेच ३०० च्या वर इतर रहिवासी व त्यांच्या कुटुंबाचे वास्तव्य आहे. या नागरिकांना लष्करी हद्दीतून जाण्यासाठी नगरवाला रोड या नावाचा रस्ता सोयीचा आहे. परंतु तो बंद करण्यात आल्याने रहिवाश्यांची मोठी गैरसोय होत आहे. सदर नगरवाला रस्ता पुन्हा पूर्ववत खुला करावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली. मात्र त्यास लष्करी अधिकार्‍यांनी प्रतिसाद न दिल्याने, प्रहार सैनिक कल्याण संघाच्या व सैनिक महासंघाच्या नेतृत्वाखाली रहिवाश्यांनी उपोषण सुरू केले उपोषणात प्रहार सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करावे लागले आहे तर राष्ट ्रीय सचिव अ‍ॅड. संजय शिरसाठ, बॉबीसिंग बाजवा, दरेवाडीचे माजी सरपंच अनिल करांडे, संजय निमसे, अशोक चौधरी, वसंत दहातोंडे, राहुल ताकपिरे, बनकर सर, पुष्पा मुंढे, मंदाबाई ठोबरे, प्रियांका तापकीर, मोहिनी ननवरे, मंगल निमसे, कमल अन्सारी यांच्यासह आजी-माजी सैनिकांचे कुटुंबिय, शाळकरी मुले, स्थानिक रहिवासी राहभागी झाले आहेत.