बंद केलेला रस्ता खुला करण्यासाठी सलग तिसऱ्या दिवशी उपोषण सुरूच

0
47

आजी-माजी सैनिक, कुटुंबियांसह लहान मुलेही उतरली आंदोलनात

लष्करी हद्दीतील रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी स्टेशन हेडकॉर्टर येथे उपोषणास
बसलेले आजी-माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय.

नगर – शहराजवळील दरेवाडी परिसरातील लष्कराच्या हद्दीतील स्थानिक रहिवाशांच्या दळणवळणाचा बंद केलेला नगरवाला रस्ता पुन्हा खुला करावा, या मागणीसाठी आजी-माजी सैनिकांसह स्थानिक रहिवाशांनी लष्कराच्या स्टेशन हेड१ॉर्टरसमोर शनिवारपासून (दि. १६) आमरण उपोषण सुरू केले आहे. सोमवारी (दि. १८) उपोषणाचा सलग तिसरा दिवस असून, अद्यापपयरत एकाही लष्करी अधिकार्‍याने उपोषणकत्यारशी चर्चा केलेली नाही. दरेवाडी परिसरासह हरिमळा, वाकोडी येथील स्थानिक रहिवाशांचा नगरवाला रस्ता हा दळणवळणाचा प्रमुख रस्ता आहे. परंतु लष्करी अधिकार्‍यांनी सदर रस्ता गेट लावून बंद केला आहे. त्यामुळे शाळेत जाणारी मुले, दवाखान्यात जाणारे रु१/२ण तसेच स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

हरिमळा परिसरात ३०० ते ४०० माजी सैनिक तसेच ३०० च्या वर माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाचे वास्तव्य आहे. या नागरिकांना लष्करी हद्दीतून जाण्यासाठी ‘नगरवाला रोड’ या नावाचा रस्ता सोयीचा आहे. परंतु तो बंद करण्यात आल्याने रहिवाश्यांची मोठी गैरसोय होत आहे. सदर नगरवाला रस्ता पुन्हा पूर्ववत खुला करावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली. मात्र त्यास लष्करी अधिकार्‍यांनी प्रतिसाद न दिल्याने, प्रहार सैनिक कल्याण संघाच्या नेतृत्वाखाली रहिवाश्यांनी उपोषण सुरू केले असून, सोमवारी (दि. १८) सलग तिसर्‍या दिवशीही सदरचे आंदोलन सुरूच आहे. या उपोषणात प्रहार सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष विनोदसिंग परदेशी, राष्ट ्रीय सचिव अ‍ॅड. संजय शिरसाठ, बॉबीसिंग बाजवा, दरेवाडीचे माजी सरपंच अनिल करांडे, संजय निमसे, भोपालसिंग, हवालदार कोंडे, कॅप्टन नजीर अहमद, आत्माराम दहातोंडे, दत्तात्रय काळे, सुनिल जपे, ए. एन. खान, सुभेदार कुलकर्णी, गोपाल जाधव यांच्यासह आजी-माजी सैनिकांचे कुटुंबिय, शाळकरी मुले, स्थानिक रहिवाशी सहभागी झाले आहेत.

दरेवाडी ग्रामपंचायतीचे पत्र दरेवाडी ग्रामपंचायतीने लष्करी अधिकार्‍यांना पत्र दिले असून, त्यात म्हटले आहे की, दरेवाडी (ता. नगर) येथील हरिमळा या ठिकाणी आजी-माजी सैनिक ५००-७०० संख्येने राहतात. तसेच सैनिक क्षेत्रात काम करायला येणारे सफाई कर्मचारी, शालेय विद्यार्थी व एम.एस. हॉस्पिटला जाणारे आजी-माजी सैनिक हे सर्व लोक नगरवाला रस्त्याने ये-जा करत असतात. नगरवाला रोड बंद झाल्यामुळे आजी माजी सैनिक तसेच सफाई कर्मचारी, विद्यार्थी व एम.एस. हॉस्पिटला जाणारे आजी – माजी सैनिक या सवारना ये-जा करणे अवघड झाले आहे. दरेवाडी येथील हरिमळा या ठिकाणचा नगरवाला रोड हा कायमस्वरुपीचा खुला करून मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.