0
51

मराठा सेवा संघाचे काम युवकांना प्रेरणादायी : आ.संग्राम जगताप

 

नगर – मराठा सेवा संघाची चळवळ गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत आहे. युवकांचे संघटन आणि सामाजिक कार्याचा वसा घेतलेली ही चळवळ सुरु असताना या संघटनेच्या इमारत बांधकामाचा भूमीपुजन कार्यक्रम टिळक रोड येथे शहराचे आ. संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. संग्राम जगताप म्हणाले की, मराठा सेवा संघाची स्थापना झाल्यापासून संघटनेने युवकांना मन, मस्तक, मनगट, मनका बळकट करण्यासाठी काम केले. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून युवकांना नवी प्रेरणा मिळाली. याचबरोबर युवकांना आपल्या पायावर उभा राहण्यासाठी अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली असून अनेक गरजुंना त्यांच्या पायवर उभे करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले. आज युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी या वास्तुचा उपयोग होणार आहे. या ठिकाणी अद्यावत अभ्यासिका, अद्यावत वाचनालय, मराठा सेवा संघाचे कार्यालय आदीसह इतर सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, अतिरिे आयुे डॉ.प्रदिप पठारे, उपायुे श्रीनीवास कुर्‍हे, सेवा निवृत्त उपअभियंता बी.के. महाडीक, श्रीकांत निंबाळकर, मनोज पारखे, अशोकराव कराळे, महादेव कोतकर, मराठा पतसंस्थेचे संचालक सतीश इंगळे, द्वारकाधिश राजेभोसले, अतुल लहारे, लक्ष्मण सोनाळे, ज्ञानदेव पांडूळे, अशोक वारकड, विठ्ठलराव लांडगे, सुर्यकांत वारकड, अमोल लहारे, विजय नवले, गुंड, अच्युत गाडे, सुदाम मडके, नंदकुमार बेरड,यशवंत तोडमल, सतिष दारकुंडे, प्रशांत गायकवाड, अ‍ॅड. मंगेश सोले, सुरभी हॉस्पिटलचे डॉ. पवार, ओंकार देशमुख, जिजाऊ ब्रिगेडच्या अनिता काळे, स्वाती जाधव आदी उपस्थित होते. मराठा सेवा संघाच्या वतीने अहमदनगर जिल्हयात अद्यावत असे कार्यालय सुरु करुन या ठिकाणी युवकांना मार्गदर्शन करण्या बरोबरच महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी काम केले जाणार आहे. तसेच समाजातील आजच्या पिढीला शेतीविषयक मार्गदर्शन, त्याच बरोबर विवाह नोंदणी सह युवकांना रोजगार निर्माण करण्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्याने, एमपीएससी व यूपीएससीच्या युवकांना मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून भविष्यात सवारनाच दिशादर्शक अशी ही अद्यावत इमारत उभी राहणार असल्याचे मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे यांनी सांगितले. मराठा सेवा संघ ही चळवळ गेल्या ३२ वर्षापासून समाजसेवेचे काम करत आहे. जिल्हाभर मराठा सेवा संघाच्या ३५० व्यावर शाखा असून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. तसेच मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचे काम संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, विर भगतसिंह परिषदेच्या माध्यामामधून केलेले आहे. तसेच आरक्षणाच्या विषायावर मराठ्यांना आरक्षण मिळावे ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून लावून धरलेली आहे.

पुढील काळात मराठा सेवा संघाचे स्वत…चे असे अद्यावत कार्यालय सुरु होत असून यासाठी पुढील पिढीला हे कार्यालय दिशादर्शक ठरणारे उभे राहणार असल्याचे मत राष्ट ्रीय महामार्गाचे इंजि.तारडे यांनी व्ये केले. एखादे काम करत असताना सातत्य ठेवल्या शिवाय उभा राहत नाही. या जागेसाठी मराठा सेवा संघाच्या माध्यामातून जिल्हाध्यक्ष इथापे यांनी सातत्य ठेवत आज भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडला आहे. मराठा सेवा संघ गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यात बहुजन महामानव यांच्या विचारावर काम करत आहे. मराठा सेवा संघाचा हेतू हा आहे की, मराठा समाजातील युवकांचे युवतींचे मन, मनगट, मेंदु बळकट करुन त्यांना यो१/२य दिशा देण्याच काम केले आहे. महानगरपालिकचे शहर अभियंता म्हणून कार्यरत असणारे इंजि.सुरेश इथापे यांनी चार वर्षापूर्वी नगर शहरात मराठा सेवा संघाचे कार्यालय व्हावे यासाठी माजी आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्याकडे मागणी केली होती. ही जागा मिळण्यासाठी माजी आमदार अरुण जगताप आणि आ. संग्राम जगताप यांची मोलाची मदत झाली असल्याचे इथापे यांनी म्हंटले आहे.