आत्महत्या केलेल्या रक्ताटे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार

0
57

 

नगर- १० डिसेंबर रोजी मोहन रेाटे (रा. बुर्‍हाणनगर) यांनी बँकेचे हप्ते थकल्याने चिचोंडी पाटील येथे विष प्राशन करून आत्म हत्या केली होती. आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या दुचाकी गाडीमध्ये चिट्ठी सापडली, त्यामध्ये एका खासगी बँकेच्या कर्मचार्‍यांवर गंभीर आरोप करत मी मेल्यानंतर पुण्यातील मनसेचे नेते व नगरसेवक वसंत मोरे यांनी मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली होती. सदरची घटना मनसेचे नेते वसंत मोरे यांना समजल्यावर त्यांनी त्वरित दिवंगत मोहन रेाटे यांच्या राहत्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला तसेच कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्वस्त केले. यावेळी माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले की, इतया अपेक्षा माझ्याकडून जनता करत आहे हे खुप ओझे होत आहे. दिवंगत रेाटे हे अत्यंत प्रामाणिक व शांत स्वभावाचे असल्याचे समजले.

आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी एका खाजगी बँकेकडून कर्ज घेऊन टेम्पो चालवीत होते. बँकेचे कर्जाचे हप्ते भरण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत होते. परंतु व्यवसायातील मंदी तसेच काही कारणांमुळे त्यांचे काही हप्ते थकीत होते. याच हप्त्यांपोटी बँकेच्या रिकव्हरी कर्मचार्‍यांकडून त्रास देण्यास सुरुवात झाली होती. याच काळात रीकव्हरी कर्मचार्‍यांकडून त्यांची गाडी भाळवणी येथून ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर दिवंगत रेाटे यांना तुमचा टेम्पो विकला असल्याचे सांगितले. त्यानंतर रेाटे यांनी आत्महत्या केली. आज रेाटे कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून माहिती घेतली असता टेम्पो हा नगर येथील रिकव्हरी गोडाऊन मध्येच असल्याचे कळले.

त्यामुळे बँकेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या त्रासाला कंटाळून रेाटे यांनी आपले जीवन संपविल्याचे समजते. मरताना त्यांनी माझ्या नावे चिठ्ठी लिहून ठेवली त्यामध्ये तात्या मी मेल्यानंतर मला न्याय मिळवून द्या अशी हाक मारून चिठ्ठी मध्ये दोन-तीन व्येी ंची नावे लिहिलेली आहेत. आम्ही आता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तसेच बँकेच्या शाखा व्यवस्थापन यांच्याशी चर्चा करून या प्रकरणातील दोषी आरोपींवर भा.दं.वि. कलम ३०४ प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.