व्यावसायिकाची दीड लाखाची रोकड दोघांनी पळविली

0
82

 

नगर – रस्त्याने पायी चाललेल्या व्यावसायिकाच्या हातातील सुमारे दीड लाख रुपयांची रोकड असलेली कापडी पिशवी पाठीमागून मोटारसायकलवर भरधाव वेगात आलेल्या दोघा अनोळखी चोरट्यांनी हिसकावून चोरुन नेल्याची घटना एमआयडीसी परिसरात गुरुवारी (दि.१४) सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. याबाबत संजय रमेश डोंगरे (रा.वडगाव गुप्ता, ता.नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी डोंगरे यांचा चेनलिंक (कंपाऊंडच्या जाळ्या) बनविण्याचा व्यवसाय आहे. ते एमआयडीसी परिसरात कामानिमित्त चाकण ऑईल मील कंपनीसमोरुन जिमखाना रोडला असलेल्या साई सेल्स२ दुकानासमोरुन पायी जात असताना त्यांच्या पाठीमागून पल्सर मोटारसायकलवर २ अनोळखी इसम आले व त्यांनी डोंगरे यांच्या हातातील कापडी पिशवी हिसकावून तेथून भरधाव वेगात पसार झाले.

त्या कापडी पिशवीमध्ये १ लाख ४७ हजार ८०० रुपयांची रोकड होती. या घटनेनंतर डोंगरे यांनी आरडा ओरडा केला मात्र तोपयरत चोरटे भरधाव वेगात पसार झाले होते. याबाबत डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि.क. ३९२, ३४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.