‘ईव्हीएम व व्ही व्ही पॅट’बाबत जिल्ह्यात जनजागृती मोहिम

0
59

नगर – भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्रराज्य, मुंबई यांचे निर्देशानुसार अहमदनगर जिल्हयातील १२ मतदार संघामध्ये आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ साठी ईव्हीएम व व्ही व्ही पॅट संदर्भात जनजागृती संदर्भात मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत मोबाईल व्हॅनद्वारे एतच व ततझअढ मशीन द्वारे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. या जनजागृती मोहीमेचा कालावधी १५ डिसेंबर २०२३ ते १५ फेब्रुवारी २०२४ असा आहे. या मोहिमेमध्ये प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी मोबाईल व्हॅन द्वारे एतच व ततझअढ बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या मोबाईल व्हॅनमध्ये एक अधिकारी, एक कर्मचारी व एक पोलीस नियुे करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे एतच प्रात्यक्षिक केंद्रे उभारण्यात आले असून जिल्ह्यातील १४ तहसिल कार्यालयात एतच प्रात्यक्षिक केंद्रे उभारण्यात आले आहे. त्या ठिकाणी १ कर्मचारी उपस्थित राहून एतच व ततझअढ चे प्रात्यक्षिक दाखविणार आहे.

जिल्ह्यातील ३७३१ मतदान केंद्राचा १०% मशिन्स (३७३ मशिन्स) प्रशिक्षण, प्रसार व जनजागृती यासाठी वापरण्यात येणार आहे. या मशिन्स १२ डिसेंबर २०२३ रोजी सर्व उपविभागीय मुख्यालयाचे स्ट्रॉगरूममध्ये ठेवणेकामी वाटप करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अहमदनगर यांचेद्वारे सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की एतच व ततझअढ मशिन्स वापराबाबत संपूर्ण माहिती करुन घ्यावी. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, अहमदनगर यांनी कळविले आहे.