दैनिक पंचांग रविवार, दि. २६ नोव्हेंबर २०२३

0
83

वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारि पौर्णिमा, शके १९४५ शोभननामसंवत्सर, कार्तिक शुलपक्ष,
भरणी १४|०५ सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६ वा. २० मि.


राशिभविष्य-

मेष : आज आपला जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी
आपल्यावर दबाव आणू शकतो. महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. आरोग्य चांगले राहील.

वृषभ : मानसन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचे सहकार्य प्रगतीचे कारण बनेल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही.

मिथुन : ठरविलेले कामे पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य विचार करून कार्य कराल. पैशासंबंधी येणार्‍या सर्व अडचणी दूर होतील.

कर्क : आजचा दिवस आपल्या कार्य- योजनेंसाठी आणि सहकार्यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये.

सिंह : बेपर्वाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. रोख रकमेची मोठी देवघेव टाळा.

कन्या : आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. प्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या खाण्या- पिण्याच्या सवयींची काळजी घ्या.

तूळ : आपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शयता आहे. प्रसिद्धी वाढण्याची शयता आहे.

वृश्चिक : अधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. मागील उधारी वसुल होईल. आपले धाडस वाढेल. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.

धनु : आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

मकर : महत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. आर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे.

कुंभ : आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात.

मीन : मागील उधारी उसनवारी वसुल होईल. यंत्रे व वाहन अपघात होण्याची शयता आहे.

                                                                                        संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर