उत्पन्नापेक्षा खर्च अधिक नको

0
207

आजकाल पैसा कोणीही मिळवत आहे. मात्र प्रत्येक जण पैशाचे नियोजन योग्य रितीने करतोच असे नाही. परिणामी पैसा असूनही आर्थिक ध्येय गाठण्यात ही मंडळी अपयशी ठरतात. कारण पैसा हातात येतो आणि पाहता पाहता तो खर्च होतो. जर आपल्यालाही असाच अनुभव येत असेल तर आपण ‘मनी डिसॉर्डर’ला बळी पडू शकतो. म्हणजेच आपण पैसा अधिक काळ बाळगू शकत नसल्याचे दिसून येते. मनी डिसॉर्डरची काही लक्षण प्रख्यात मानसशास्त्रज्ञ बॅ्रक्ड क्लोंटज यांनी सांगितली आहेत. यापासून कसा बचाव करता येईल, हे पाहुया

फायन्शाशियल डिनायल

लक्षण – या वर्गातील मंडळी आवश्यक गोष्टीत किंवा क्रेडिट कार्डचे बिल भरण्यात पैसे खर्च करत नाहीत. कोठेही गुंतवणूक आ करत नाहीत आणि बँकेत अकारण पैसे ठेवण्यास समाधान मानतात. कर भरण्याची तारीख देखील ते वाढवत राहतात. आपला पोर्टफोलिओ मॅनेज करु शकत नाहीत. पैशाचा योग्य वापर न करणे ही बाब आर्थिक चिंता वाढवणारी ठरते.

उपचार : या वर्गातील मंडळींनी सर्व आर्थिक घडामोडींसाठी तारीख निश्‍चित करावी. तसेच फोनवर रिमांइडंर सेट करा. जर आपण गुंतवणूकीवरून काळजीत असाल तर एखाद्या समुपदेशकाची देखील मदत घेऊ शकता.

फायन्शाशियल रिजेक्शन

लक्षण – आपण जाणीवपूर्वक आपला सर्व पैसा कोठेही आणि कसाही देता. चांगले उत्पन्न मिळवत असाल तरीही महिनाखेरीस आपल्याकडे काहीही राहत नाहीत. त्यामुळे आपले आर्थिक ध्येय पूर्ण होऊ शकत नाही. आपल्याकडे आत्मसन्मानाची कमतरता आहे. पैसा गोळा करण्यास आपल्याला कंटाळा येतो.

उपचार – आपले वेतन जोडीदाराकडे देणे. तो पैशाची योग्य रितीने गुंतवणूक करु शकतो. किंवा आपले सर्व पेमेंटस आटोमेटिक मोडवर ठेवावे. यातून वेतन जमा होताच तो पैसा योग्य ठिकाणी गुंतवला जाईल.

अंडरस्पेसिंग

लक्षण – पैसे खर्च करणे ही वायफळ बाब असल्याचे गृहित धरून आपण अजागळपणे जीवन जगत असता. आपण घरातील प्राथमिक गरजा भागवण्यासाठी देखील पैसा खर्च करत नाहीत.

उपचार – पती किंवा पत्नीला आर्थिक नियोजन करु द्या. याशिवाय आर्थिक सल्लागार किंवा समुपदेशकाची मदत घ्या.

कंपलसिव्ह होर्डिंग

लक्षण – या वर्गातील मंडळी घरात केवळ वस्तूच नाही तर पैसा गोळा करत राहतात.ही सवय ही इतक्या उच्च कोटीवर पोचते की घरात सामान्यपणे जगणे देखील कठिण होत जाते.

उपचार – आपल्या गुंतवणुकीला ऑटोमेटिक मोडवर ठेवा. वेतन येताच तो पैसा इतरत्र खर्च होण्याअगोदरच तो योग्य ठिकाणी गुंतवला जाईल याकडे लक्ष ठेवणे. महत्त्वाचे म्हणजे क्रेडिट कार्ड फेकून देणे हिताचे राहिल.

वर्कहोलिज्म

लक्षण – आपण कोणताही ब्रेक न घेता भरपूर मेहनत करतो. कारण आपल्याला अधिक पैसा जमवायचा असतो. आपल्या मनात एक आथिक असुरक्षितेचा भाव असतो. त्यामुळे आपण जेवढा पैसा अधिक कमावतो, तेवढे चांगले वाटत असते.

उपचार – लहानसहान लक्ष्य करा आणि ते गाठण्यासाठी आपल्याला किती कमवायचे आहे, हे निश्‍चित करा. जेव्हा आपण लक्ष्य गाठतो तेव्हा काहीवेळ विश्रांती घ्या.

ओव्हरस्पिडिंग किंवा कंपलसिव्ह बायिंग

लक्षण  आपण वस्तू खरेदीत तत्पर असतो आणि पैसा खर्च करण्यास उत्सुक असतो. खरेदीवर पैसा खर्च केल्याने आपल्याला आनंद मिळतो. जोपर्यंत पैसा खर्च होत नाही तोपर्यंत आपण खूपच अस्वस्थ राहतो आणि पैसा खर्च केल्यानंतर आपल्याला आराम मिळतो. अर्थात शॉपिंग केल्यानंतर घरी येतो तेव्हा अ्रापण पुन्हा दु:खी होतो. ही प्रक्रिया कधीच थांबत नाही.

उपचार – कोणत्याही मनोविकार तज्ञांशी चर्चा करुन यावर उपाय शोधा. यामुळे आपल्या मनातील चिंता संपेल आणि खर्च करण्याची सवय देखील बदलेल.