भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक (जयंती) निमित्त १० एप्रिल रोजी शोभायात्रा, चौक सजावट, रांगोळी स्पर्धा, संध्याकाळी भक्तीसंध्या कार्यक्रम

नगर – संपूर्ण जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देणार्‍या भगवान महावीर स्वामींचा जन्म कल्याणक (जयंती) १० एप्रिलला साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकल जैन समाजातर्फे सकाळी ७.३० वाजता जैन मंदिर, कापडबाजार येथून शोभायात्रा निघणार आहे. अशी माहिती श्री ॠषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाचे मुख्य ट्रस्टी सुभाषलाल झुंबरलाल मुथा यांनी दिली.

ते म्हणाले, या यात्रेच्या सुरूवातीला सनई, नगारा, चौघडा, बॅडपथक, घोडेस्वार, उंट त्यामागे डोयावर मंगल कलश घेतलेल्या लहान मुली, विविध वेशभूषा धारण केलेले लहान मुले, मुली, पांढरे वस्त्र परिधान केलेले पुरुष आणि केशरी, पिवळ्या, लाल साड्या परिधान केलेल्या भगिनी असणार आहेत. भगवान महावीर स्वामींची प्रतिमा असलेले वाहन, रथ व शेवटी अनुकंपा (प्रसाद) ची गाडी रहाणार आहे. ही शोभायात्रा अर्बन बॅक चौक, घुमरे गल्ली, गुजर  गल्ली, आदेश्वर जैन मंदिर, लक्ष्मीबाई कारंजा, चितळे रोड, नेता सुभाष चौक, नवीपेठ जैनस्थानक, घासगल्ली, महात्मा गांधी रोड, तेलीखुंट चौक, दाळमंडई कोपरा, आडते बाजार, गंजबाजार, सराफ बाजार, जुना कापड बाजार, पलक ज्वेलर्स दुकाना जवळून  खिस्त  गल्ली, बुरूड गल्ली, जुनी वसंत टॉकीज रोड, सहकार सभागृह रोड मार्गे धार्मिक परिक्षा बोर्ड, आनंदधाम येथे  जाईल. तेथे महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनॠषीजी म. सा, प्रबुद्ध विचारक आदर्शॠषीजी म. सा, संस्कार प्रेमी अलोकॠषीजी म. सा, आदी ठाणा-३. साध्वी श्री सत्यप्रभाजी म. सा, श्री त्रिशलाकंवरजी म. सा, श्री पुष्पकंवरजी म. सा, श्री विश्वदर्शनाश्रीजी म. सा, श्री दिव्यदर्शनाजी म. सा, श्री विपुलदर्शनाजी म. सा, श्री आराधनाश्रीजी म. सा,  श्री अमितज्योतीश्रीजी म. सा, श्री विचलक्षणाजी म. सा, श्री विभक्तीश्रीजी म. सा, श्री उदयप्रभाजी म. सा. आदि ठाणा आदी साधू-साध्वीजींच्या
उपस्थितीत महावीर स्वामींच्या जीवन चरित्रावर जाहीर प्रवचन तथा गुणानुवाद होईल. हा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांसाठी गौतम प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरवर्षी प्रमाणे चौक सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी आपली नावे द्यावीत. चौका-चौकात व शोभायात्रा  मार्गावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले असून पहिले बक्षीस ११०० रुपये, दुसरे बक्षीस ९०० रुपये, तिसरे बक्षीस ७०० व उत्तेजनार्थ सहा बक्षीसे प्रत्येकी ३०० रुपयांची ठेवण्यात आलेली असून इच्छुकांनी आपली नावे जैन मंदिर, कापडबाजार येथे नोंदवावीत. शोभायात्रेत सुरूवातीपासून शेवटपर्यंत सामील होणारे भक्तांसाठी शहराच्या प्रमुख
मार्गावर तीन ठिकाणी लकी ड्रॉ कुपनचे आयोजन केलेले असून लकी ड्रॉ विनर साठी पहिले बक्षीस ४०० रूपये, दुसरे बक्षीस ३०० रूपये, तिसरे बक्षीस २०० रूपये ठेवण्यात आले आहे. डोयावर कळस (घडा) घेणारे लहान मुलींसाठी बक्षीसे ठेवण्यात आलेली आहेत. शहरातील सर्व बंधू-भगिनींनी व लहान मुला-मुलींनी या मिरवणुकीत सहभागी होऊन शोभायात्रेची शोभा वाढवावी.

जैन बांधवांनी आपल्या घरावर जैन ध्वज लावून घरासमोर रांगोळी काढून हा जयंतीचा कार्यक्रम साजरा करावा, असे आवाहन सकल जैन समाजातर्फे करण्यात आले आहे. चौक सजावट पहिले बक्षीस ३१०० रूपये, दुसरे बक्षीस २१०० रूपये, तिसरे बक्षीस १५०० रूपये तर उत्तेजनार्थ तीन बक्षीस प्रत्येकी ७०० रूपये प्रमाणे  देण्यात येतील. या दिवशी जैन सोशल फेडरेशन तर्फे सायंकाळी ७ वाजता भक्ती संध्या कार्यक्रम आनंदधाम येथे आयोजित करण्यात आला आहे. इंदोर येथील गायक प्रणव भाटिया व सोनाली पुराणिक हे भक्ती संध्या सादर करणार आहेत.

या सर्व कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन सुभाष मुथा, ओसवाल पंचायतचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, श्रावक   चे अध्यक्ष हस्तीमल मुनोत, बडीसाजनचे अध्यक्ष प्रेमराज बोहरा, धार्मिक परिक्षा बोर्ड सेक्रेटरी संतोष बोथरा, दिगंबर जैन समाजाचे महावीर बडजाते, नरेंद्र लोहाडे, अ‍ॅड संतोष भोसे, संजय महाजन, महावीर गोसावी, जैन गुजराथी समाजाचे अध्यक्ष डॉ. विनयभाई शहा व एच. व्ही. शहा, कमलेशभाई गांधी, मयुरभाई मेहता, भाजप महाराष्ट्र प्रदेश
कार्यकारिणी सदस्य वसंत लोढा, डॉ. प्रकाश कांकरिया, माणिकनगर जैन मंदिराचे अशोक मुथ्था व तलकशीभाई सावला, ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे मा. ट्रस्टी बाबुशेठ बोरा, वात्सल्य संस्था अध्यक्ष अजित बोरा, महावीरनगर श्री संघाचे अध्यक्ष अनिल कटारिया, केडगावचे पोपटलाल शिंगी, आगरकर मळा श्री संघाचे अध्यक्ष अभय कोठारी, उपाध्यक्ष सुरेश पगारिया, विनायकनगर श्री संघाचे अध्यक्ष किशोर पितळे, सावेडी श्री संघाचे अध्यक्ष किशोर गुगळे, जवाहरलाल कटारिया, शांतीलाल बोरा, सिव्हिल हडको जैन मंदिराचे अध्यक्ष प्रफुल्लभाई मेहता, सीए राजेशभाई शहा, सिव्हिल हडको श्री श्रावक
संघाचे अध्यक्ष विजयलाल गुगळे, धार्मिक परिक्षा बोर्ड उपाध्यक्ष आनंदराम मुनोत, अखिल भारतीय जैन कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष बाबुशेठ लोढा, बोर्ड सेक्रेटरी संतोष गांधी, मर्चंट बॅकेच्या संचालिका मीनाताई मुनोत व प्रमिलाताई बोरा, जैन सोशल फेडरेशनचे सचिन डुंगरवाल, सीए महेश भळगट, अमोल कटारिया, गणेश कांकरिया, अमोल कोठारी, विशाल भंडारी, महावीर कटारिया, सीए अभय कटारिया, श्री जैन ओसवाल पतसंस्थेचे चेअरमन समीर बोरा, अभय पितळे व इतर सर्व पदाधिकारी, कापडबाजार जैन मंदिराचे ट्रस्टी मंडळ, जैन मंदिराचे सिमंधर स्वामी भक्ती मंडळाचे अध्यक्ष व सर्व
पदाधिकारी. भिंगार, केडगाव, सावेडी व सर्व उपनगर व समस्त नगर येथील भारतीय जैन संघटना, जैन सोशल फेडरेशन, जय आनंद फौंडेशन, श्री महावीर प्रतिष्ठान, सकल राजस्थानी युवा मंच, जैन ओसवाल युवक संघ, बडीसाजन ओसवाल युवक संघ व सकल जैन संघाच्या पदाधिकारी यांनी तसेच सर्व मंडळांच्या प्रमुखांनी कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.

जैन ध्वज (झेंडा) जैन मंदिर, कापडबाजार येथे विनामूल्य मिळेल. रांगोळी व चौक सजावट स्पर्धेचे निरीक्षण सौ. शैला गांधी, सौ. संगीता गांधी व सौ. सरोज कटारिया इत्यादी करणार आहेत. चौक सजावट, लकी विनर, रांगोळी स्पर्धा, लहान मुला-मुलींची बक्षीसे आनंदधाममध्ये प्रवचनाच्या वेळी देण्यात येणार असल्याची माहिती सुभाष मुथा यांनी दिली.

विश्व नवकार महामंत्र दिनानिमित्त नगरमध्ये नवकार कलश रॅली

नगर – जैन इंटरनॅशनल    ऑर्गनायझेशन (जितो) ९ एप्रिल रोजी देशासह विदेशात  विश्व नवकार महामंत्र दिवस
साजरा करण्यात येत आहे. या ऐतिहासिक दिवसाच्या प्रचार प्रचारार्थ अहिल्यानगर येथे जितो अहिल्यानगरच्यावतीने नवकार
कलश रॅली काढण्यात आली. आनंदधाम येथे आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. आलोकऋषीजी  महाराज यांनी मांगलिक दिली. जारो भाविक या रॅलीत सहभागी
झाले होते. चौकाचौकात समस्त नगरकरांनी पुष्पष्टी करून रॅलीचे
स्वागत केले.
यावेळी गौतम मुनोत, नरेंद्र बाफना, माजी उपमहापौर गणेश भोसले, अमित मुथा, आलोक मुनोत, तुषार कर्नावट, अमित
पोखरणा, सुमंगला मुनोत, सौरभ भंडारी, जितेंद्र लोढा, प्रितेश दुगड, मेघना मुनोत, चेतन भंडारी, यश भंडारी, संगिता मुथियान,

 

अंशु मुनोत, सोनाली डुंगरवाल, दीपाली मुथा, खुशबु मुनोत, रितेपटवा, चिराग शेटिया, निखिल गांधी, ऋषभ बोरा यांच्यासह जितो पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.  नवकार महामंत्र दिवसानिमित्त ९ एप्रिल रोजी सकाळी ७.०२ ते
९.३६ यावेळेत धार्मिक परीक्षा बोर्ड येथे सामूहिक नवकार मंत्र जाप कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त पवन नाईक, भूषण मालू व नगरच्या कलाकारांनी तयार केलेली नवकार नाद धून सादर करण्यात येणार आहे. याशिवाय विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.  कार्यक्रमाची जय्यत तयारी चालू असून मंडप उभारण्यात आलाआहे. तसेच खुर्च्यांची व्यवस्था असून जागोजागी एलईडी स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली आहे.  अतिशय पवित्र पावन वातावरणात
मंगलकारी नवकारी मंत्राची जादू प्रत्येकाला अनुभवता येणार आहे. देशभरात एकाच वेळी विविधठिकाणी हा कार्यक्रम णारहे. त्याचे थेट प्रक्षेपणही केले  जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक बडे उद्योजक, दिग्गज सेलिब्रेटी यात आवर्जून सहभागी होऊन संबोधित करणार आहेत.
या सोहळ्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे. ही नोंदणी नवकार महामंत्र दिनाला
शासन मान्यता मिळण्यासाठी महत्वाची आहे. स्थानिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक नसली तरी या नोंदणीतून सरकार दरबारी सर्व भाविकांची मोठी मागणी पोहचण्यास मदत होणार आहे. नगरमध्ये आनंदधाम येथील कार्यक्रमानंतर सर्वांसाठी केशरगुलाब मंगल कार्यालयात गौतम प्रसादीची व्यवस्था करण्यात आली आहे.
भाविकांनी नवकार महामंत्र जाप कार्यक्रमात सर्व जाती समूहातील, धर्मातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जितो अहिल्यानगरच्यावतीने करण्यात आले आहे

 

 

 

 

पालक शाळा ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अभिनव उपक्रम

नगर – पालकांची शाळा हा आगळावेगळा उपक्रम मेहेर इंग्लिश स्कूलने राबविला आहे. यामुळे पालकांना त्यांच्या मुलांच्या
शिक्षणाविषयी पालकांना मुलांच्या दैनंदिन शिक्षणाविषयी व धोरणांविषयी व शालेय कामकाजाविषयी अधिक माहिती मिळेल.
तसेच शालेय कामकाजात पालकांचा सहभाग वाढेल.  तसेच पालक व शिक्षकांचा संवाद घडेल. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांची शाळा हा अभिनव उपक्रम आहे, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांनी केले आहे.

हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये  शनिवारी पालक शाळा भरविण्यात आली. जिल्ह्यात प्रथमच पालक शाळा भरल्याने पालकांमध्ये कुतुहल, उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते. शाळेची घंटा वाजली आणि पालक शाळेत दाखल झाले. शाळेमध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच फुग्यांची आकर्षक कमान करुन गुलाब पुष्प देऊन पालकांचे स्वागत करण्यात आले. आलेल्या पालकांना वही व पेनचे वाटप करण्यात आले. यावेळी
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, कार्याध्यक्ष डॉ.रमेश झरकर, मेहेर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी, कार्यकारणी सदस्य प्रा.ज्योती कुलकर्णी, निर्मलाताई भंडारी, शिल्पा धोपावकर, प्राचार्या प्रा.अनुरीता झगडे आदी उपस्थित होते.

जगदीश झालानी म्हणाले, पालक शाळा हा नवीन उपक्रम मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये सुरू करण्यात आला आहे. दर शनिवारी पालकांची शाळा भरविण्यात येईल. मागील आठवड्यात विद्यार्थ्यांनी काय शिक्षण घेतले याची माहिती पालकांना दिली जाईल. पालकांच्या व मुलांच्या अडचणी सोडविण्यात येतील. पालक शाळा या उपक्रमासाठी हिंदसेवा मंडळाच्या सर्व पदाधिकार्‍यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. नगर शहरात पालक शाळा हा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आला आहे तसेच सीबीएससी पॅटर्न शाळेत सुरू करण्यात आला आहे. डॉ.रमेश झरकर म्हणाले, एकेकाळी मेहेर इंग्लिश
स्कूलमध्ये विद्यार्थी नव्हते. परंतु चेअरमन जगदीश झालानी यांनी शाळेत राबविलेल्या विविध उपक्रमांमूळे मेहेर
इंग्लिश स्कूलने फिनिस पक्षाप्रमाणे अल्पावधीतच उंच भरारी घेतली आहे. पालकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करून इंग्रजी विषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण  करून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी येथील सर्व शिक्षक कार्यरत आहेत. तसेच
शाळेच्या मुख्याध्यापिका प्रा. अनुरिता झगडे यांनी देखील नविन उपक्रम राबविले आहेत.

ज्योती कुलकर्णी म्हणाल्या, यश मिळवायचे असेल तर प्रयत्न केले पाहिजे. पालकांची शाळा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. प्रा.अनुरीता झगडे म्हणाल्या, पालक शाळा हा उपक्रम राबविण्यासाठी हिंद सेवा मंडळाचे सर्व
पदाधिकारी यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे. तसेच चेअरमन जगदीश झालानी यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
पालकांच्या शाळेमध्ये एरोबिस मेडिटेशन व आरोग्य विषयक माहिती दिली जाईल. या पालक शाळेला
पालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या कार्यक्रमासाठी मेहेर पालक, शिक्षक उपस्थित होते. यावेळी उषा भालेराव यांनी आभार मानले.

सकल ब्राह्मण समाज सेवा संस्थेच्यावतीने भार्गव दर्शन यात्रेचे आयोजन

नगर – सकल ब्राह्मण समाज सेवा संस्था अहिल्यानगरच्यावतीने २१ ते ६ एप्रिल या कालावधीत अहिल्यानगर ते वाशिम अशा
६ दिवसाच्या भार्गव दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सकल ब्राह्मण समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ पोतदार व विजय देशपांडे यांनी दिली. यात्रेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या व्यक्तीस प्रत्येकी ४ हजार रुपये फी आकारण्यात येणार असून त्यामध्ये २द२ लझरी बसने प्रवास, निवास व्यवस्था, चहा, नाश्ता, २ वेळचे जेवण व पिण्याचे पाणी अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उपक्रमाबाबत ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. पवननगर येथील श्रीराम मंदिरात पत्रिका अर्पण करून त्यांनी या धार्मिक कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी राजाभाऊ पोतदार, विजय देशपांडे, डॉ. सागर बोरुडे, प्रशांत भालेराव, अतुल शुल्क, गणेश जोशी, ओंकार देशपांडे, हेमंत जोशी, रामनिवास पारीख, राजेंद्र कुलकर्णी, मनिषा कुलकर्णी, प्रज्ञा जोशी, अनिरुद्ध जोशी, सोनाली शुल्क, अभिजीत बल्लाळ, प्राजक्ता
भालेराव, प्रणाली जोशी, मंगेश जोशी, निखिल देवरे, निलेश भालेराव, सार्थक भोंग, श्रीगोपाल जोशी आदी उपस्थित होते.

२१ ते २६ एप्रिल या कालावधीत भार्गव दर्शन  यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेचे प्रस्थान २१ एप्रिल रोजी काळी ६ वाजता दिल्ली गेट अहिल्यानगर येथून होणार असून  छत्रपती संभाजीनगर, जालना, देऊळगाव, राजा सिंदखेडराजा, मेहकर, वाशिम, औंढा नागनाथ,  हिंगोली, पुसद, माहूर, डीग्रस, लाड कारंजा, मूर्तिजापूर, अकोला, खामगाव, मलकापूर, मुक्ताईनगर, ओंकारेश्वर, जानापाव, सेंधवा, शिरपूर, धुळे, मालेगाव, मनमाड, येवला, कोपरगाव, शिर्डी, राहता, राहुरी मार्गे २६ एप्रिल रोजी अहिल्यानगर येथील रेणुकामाता मंदिरात पोहोचणार आहे.

इच्छुक भाविक भक्तांनी माहितीसाठी राजाभाऊ पोतदार मो. ८८३००१८५५३, विजय देशपांडे मो. ९६२३४५५५९९, श्रिया देशमुख ८२७५४३८२०२, अतुल शुल मो. ९६८९५५८९७९, हेमंत जोशी मो. ९८२२८६६०५९, दत्तात्रय
कुलकर्णी मो. ९४०४२५०७३६, अनिल आवटी मो. ८४४६२२१४०२, केतन बडवे मो. ९५०३०३०३१७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सकल ब्राम्हण सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

रोजगार मेळाव्यातून नाईट हायस्कूलच्या ३६ विद्यार्थ्यांना मिळाली प्लेसमेंट

नगर – हिंद सेवा मंडळ संचलित भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ३६ विद्यार्थ्यांना एमआयडीसी कंपनीत प्लेसमेंट देण्यात आले. नुकतेच रात्रशाळेसह समाजातील गरजवंत, बेरोजगार सर्व विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षांसाठी महिनाभर सुट्टी घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना कामावरून काढून टाकण्यात
आले होते. या विद्यार्थ्यांना पुन्हा रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या पुढाकाराने
व मासूम संस्थेच्या सहकार्याने रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये एमआयडीसी मधील
विविध कंपन्यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना जागेवर प्लेसमेंट दिल्या. परीक्षा काळात नोकरी गमावलेल्या व काही
बेरोजगार युवकांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे रोजगाराची संधी निर्माण करुन देण्यात आली. मासूम संस्थेच्यावतीने रात्रशाळेतील आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करियरवर मार्गदर्शन शिबिराचा देखील या रोजगार
मेळाव्यासाठी फायदा झाला.

विद्यार्थ्यांना रात्रशाळेत  शिक्षणाबरोबर करियर घडविण्याचे कार्य देखील मासूम संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे.
अनेक विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आलेली आहे. त्यांना समाजात सक्षमपणे उभे
करण्याचे काम भाई सथ्था नाईट हायस्कूल करत असल्याचे रात्र शाळेच्या चेअरमन प्रा.ज्योतीताई कुलकर्णी यांनी सांगितले.

हिंद सेवा मंडळाचे  अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. रमेश झरकर, मानद सचिव संजय जोशी, माजी कार्याध्यक्ष अनंत फडणीस, ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, अजित बोरा, दादा चौधरी शाळेचे चेअरमन
सुमतीलाल कोठारी, रात्र शाळेच्या चेअरमन प्रा.ज्योतीताई कुलकर्णी, माजी चेअरमन  डॉ. पारस कोठारी, प्राचार्य
सुनील सुसरे, मासूम संस्थेच्या संचालिका निकिता केतकर, कमलाकर माने, युवराज बोराडे, पॉल रेमेडियस, निलेश
ठोंबरे यांनी नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

‘क्रेडाई अहिल्यानगर शाखे’च्या अध्यक्षपदी गिरीश अग्रवाल तर सचिवपदी दीपक बांगर

उपाध्यक्षपदी अमित वाघमारे, प्रसाद आंधळे, सागर गांधी यांची निवड

नगर – देशभरातील बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संघटनेच्या अहिल्यानगर शाखेच्या अध्यक्षपदी गिरीश अग्रवाल यांची तर सचिवपदी दीपक बांगर यांची निवड झाली आहे. सन २०२५-२०२७ या वर्षासाठी नूतन कार्यकारिणी नुकतीच  वडण्यात
आली आहे. उपाध्यक्षपदी अमित वाघमारे, प्रसाद आंधळे सागर गांधी, खजिनदारपदी विक्रम जोशी, सहसचिवपदी कमलेश झंवर (भिंगारवाला), सहखजिनदारपदी अमित फिरोदिया, संचालक म्हणून मयुर कोठारी, राजेंद्र पाचे, संदीप भापकर, अनिल गांधी यांची निवड झाली आहे.

गिरीश अग्रवाल म्हणाले की, बांधकाम क्षेत्रात अनेक आमूलाग्र बदल होत आहेत. शासनाने रेरा सारखा कायदा  णून ग्राहकांना विश्वसनीयतेची हमी देण्याचा प्रयत्न केला आहे. क्रेडाईचे सर्व सभासद शासकीय नियमानुसार ग्राहकांना सेवा देण्याचा प्रयत्न करतात. तसेच देशपातळीवर बांधकाम व्यावसायिकांचा आवाज सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी संघटना प्रयत्न करते. मावळते अध्यक्ष अमित मुथा यांनी दोन वर्षामध्ये त्यांचे टीम ने अहिल्यानगर शाखेने शहरात प्रॉपर्टी एस्पो भरवून शहरातील गृहप्रकल्प, कमर्शियल प्रोजेट, फायनान्स योजना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला असे सांगितले. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला चालना मिळाली. शासनाने ई नोंदणी ही नवीन प्रणाली विकसित
केली आहे. त्याचाही लाभ ग्राहकांना करून देण्याचे काम माझ्या टीम ने केले हे सांगितले. तसेच पुढील क्रेडाई
अहिल्यानगर च्या नूतन संचालक मंडळास त्यांनी शुभेच्छा दिल्या. सचिव दीपक बांगर म्हणाले, क्रेडाई अहिल्यानगर संघटनेने विविध उपक्रम राबवून विश्वासाहर्ता जपली आहे. नगर शहराचा नियोजनबद्ध विकास करण्याच्या दृष्टीने क्रेडाई प्रशासनाशी संवाद साधून असते. पर्यावरण संवर्धन, सुशोभीकरणासाठीही पुढील कार्यकाळात आम्ही क्रेडाईच्या वतीने प्रयत्न करू असे आश्वासन व्यक्त केले. क्रेडाई अहिल्यानगर शाखेच्या सल्लागार समिती सदस्य पदी आशिष पोखर्णा, संजय गुगळे, अ‍ॅड. जयवंत भापकर यांची निवड झाली आहे. क्रेडाई अहमदनगरच्या विविध कमिटी व पदाधिकारी पुढीलप्रमाणे – क्रेडाई युथ विंग- कन्व्हेनर- धवल इंगळे, को कन्व्हेनर- तुषार लोढा आणि नितेश गुगळे. क्रेडाई वुमेन्स विंगय्कन्व्हेनर- आर्की. साक्षी अमित मुथा

सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा महत्त्वाची

बाळकृष्ण सिद्दम यांचे प्रतिपादन; गांधी मैदान येथील प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालयात नागरिकांची नेत्र तपासणी

नगर – सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा महत्त्वाची बनली असून, सर्वसामान्य वर्गाला महागाईच्या काळात आरोग्यसेवा घेणे परवडत नाही. महागाईच्या काळात सर्वसामान्यांची सोय होण्यासाठी आरोग्य शिबिर नागरिकांसाठी आधार ठरत आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढलेले दृष्टीदोष कमी होण्यासाठी नेत्र तपासणी शिबिर महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम यांनी केले.

शहरातील गांधी मैदान येथे प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालयात थोरात सुपर स्पेशालिटी आय केअर व
अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. सीएसआरडीच्या इन्स्टिट्यूट
ऑफ सोशल वर्क अ‍ॅण्ड रिसर्च अहमदनगर यांच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरात सर्व शालेय शिक्षकांसह परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला.

सीएसआरडी येथील एमएस डब्ल्यूच्या मार्गदर्शिका वैशाली पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शिबिराचे
उद्घाटन पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल, माध्यमिक विद्यालयाचे  मुख्याध्यापक संदीप छिंदम, प्राथमिकचे शिक्षक रावसाहेब इंगळे, अनंता गाली, शोभा बडगू, रत्ना रच्चा, सरोजिनी आतकरे,  पुष्पा म्याकल आदी उपस्थित होते. या शिबिरात पालक व नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. तर गरजूंना शंभर रुपयात नंबरचे चष्मे उपलब्ध करुन देण्यात आले होते. शिबिर राबविल्याबद्दल नागरिकांच्यावतीने आयोजकांचे आभार मानण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी केदार दुर्गा, श्रवण घोगरे, प्रशांत गोयरे, शुभम  वाघमारे, हर्षदा मांडेलकर यांनी परिश्रम घेतले.

शाश्वत सुख अध्यात्मिकतेमध्येच मिळत असत

हभप प्रांजलताई जाधव यांचे विचार; नालेगाव गाडगीळ पटांगण येथे हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ

नगर – परमेश्वराच्या नाम चिंतनाचा मार्ग स्वीकारल्यानंतर नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यात प्रवेश करू शकत नाही, जे आपल्याला अपेक्षित आहे ते घडून आणण्याची ताकद नाम चिंतनामध्ये आहे, त्यामुळे शाश्वत सुख अध्यात्मिकतेमध्येच मिळत असते, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जग इतया जवळ आले आहे की ते आपल्या खिशात आहे, विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी मनुष्य दुःखीच आहे मात्र आध्यात्मिकतेचा मार्ग स्वीकारल्यास तो आनंदी जीवन जगू शकतो, संतांचे विचार आचार अंगीकारल्यास आपले जीवन सार्थ झाल्याशिवाय राहणार नाही, अध्यात्मिकतेने नेहमीच
समाजाला संस्कार दिले आहे त्यामुळे आपल्या जीवनाचा उद्धार झाला आहे जगामध्ये वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान
सर्वश्रेष्ठ आहे, असे मौलिक विचार हभप प्रांजलताई जाधव यांनी मांडले.

नालेगाव गाडगीळ पटांगण येथे श्री छत्रपती शिवराय तरुण मंडळाच्या वतीने हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ झाला. यावेळी माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल, सुनीता मुदगल आदीसह नागरिक उपस्थित होते.

नालेगाव गाडगीळ पटांगण येथे गेल्या ३३ वर्षापासून हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, आजच्या युवा पिढीला संत महंतांच्या विचारांची खरी गरज आहे, त्यामुळे किर्तन सेवेच्या माध्यमातून समाजापर्यंत
अध्यात्मिकतेचे धडे देण्याचे काम केले जाते धार्मिक कार्यक्रमासाठी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत असून आपल्या विचारांची देवाणघेवाण करत असतात त्यामुळे एकमेकांमध्ये ऋणानुबंध निर्माण होत असतो असे मत दत्तात्रय मुदगल यांनी व्यक्त केले.

मागील आर्थिक वर्षात महानगरपालिकेची विक्रमी कर वसुली

वर्षभरात ६१.१८ कोटींचा कर जमा; शास्तीमाफी योजनेत १७.१८ कोटी वसूल; नवीन वर्षात १०० कोटींहून अधिक वसुलीचे उद्दिष्ट : आयुक्त यशवंत डांगे

नगर – सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीची विक्रमी वसुली झाली आहे. वर्षभरात ७२०६६ करदात्यांनी कर भरला असून ६१.१८ कोटींची वसुली झाली आहे. शास्ती माफी योजनेत
१६७८७ करदात्यांनी लाभ घेऊन १७.१८ कोटींचा कर भरला आहे. त्यामुळे वर्षभरात ८०.५८ कोटींच्या वसुलीची नोंद होऊन १९.३९ कोटींची सवलत देण्यात आली व ६१.१८ कोटी रुपये महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. विक्रमी वसुली केल्याबद्दल आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी उपायुक्तांसह वसुली विभागाचे अधिकारी, सर्व प्रभाग अधिकारी व वसुली कर्मचार्‍यांचे कौतुक केले. तसेच, नव्या आर्थिक वर्षात १०० कोटींपेक्षा अधिक वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेऊन काम करावे, अशा सूचना दिल्या.

यशवंत डांगे यांनी मंगळवारी महानगरपालिकेत आढावा बैठक घेतली. यात सुरुवातीलाच वसुली विभागाकडून आर्थिक वर्षात झालेल्या वसुलीची माहिती देण्यात आली. वर्षभरात ७२०६६ करदात्यांनी कर भरल्याने ८०.५८ कोटींच्या वसुलीची नोंद झाली. शास्ती माफीमुळे १९.३९ कोटींची सवलत देण्यात आली. त्यामुळे ६१.१८ कोटी वसूल झाले आहेत. यापूर्वी सन
२०२१-२०२२ मध्ये ५८.८२ कोटी, सन २०२२- २०२३ मध्ये ५७.५९ कोटी, सन २०२३-२०२४ मध्ये ५६.०९ कोटी रुपये वसुली झाली होती. या वर्षी सर्वाधिक ६१.१८ कोटी रुपये वसूल झाले आहेत. यात शास्ती माफी योजनेमुळे १७.१८ कोटी वसूल झाले आहेत. यशवंत डांगे यांनी विक्रमी वसुली केल्याबद्दल उपायुक्त प्रियांका शिंदे, वसुली विभागाचे प्रमुख व्ही. जी.
जोशी, सर्व प्रभाग अधिकारी व कर्मचार्‍यांचे बैठकीत कौतुक केले.

महापालिकेच्या कर वसुलीमध्ये वर्षभरात ऑनलाईन कर भरणार्‍यांची संख्याही वाढली आहे. वर्षभरात १५८३१ करदात्यांनी ऑनलाईन पद्धतीने कर भरला आहे. एकूण वसुलीच्या तुलनेत ऑनलाईन कर भरणार्‍यांचे प्रमाण २१.९६ टक्के आहे. नव्या आर्थिक वर्षापासून नवीन दरानुसार पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. तसेच, मालमत्तांचे सर्वेक्षण व पुनर्मूल्यांकन सुरू असून यामुळे अनेक नवीन मालमत्ता कराच्या कक्षेत येणार आहेत. मोजमापे अद्ययावत होणार असल्याने घरपट्टीची मागणीही आपोआप वाढणार आहे. त्यामुळे या नव्या आर्थिक वर्षात १०० कोटींपेक्षा अधिक वसुलीचे उद्दिष्ट ठेऊन काम करावे, अशा सूचना यशवंत डांगे यांनी बैठकीत दिल्या आहेत.

तसेच, महापालिकेच्या मालकीच्या व सध्या भाडेकराराने देण्यात आलेल्या गाळ्यांचे भाडे, वर्ग खोल्यांचे भाडे याचीही वसुली मोठ्या प्रमाणात झाली आहे. सन २०२२-२०२३ मध्ये १.७६ कोटी, सन २०२३-२०२४ मध्ये २.२५ कोटी वसुली
झाली होती. महानगरपालिकेने सन २०२४-२०२५ मध्ये सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मार्केट विभागाकडून वर्षभरात ५.९१ कोटी रुपये भाडे वसूल करण्यात आले आहे. मागील वर्षीपेक्षा दुप्पटहून अधिक वसुलीची नोंद झाल्याने यशवंत डांगे यांनी मार्केट विभागाच्या कामाचेही कौतुक केले. दरम्यान, कर वसुली हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. चांगली वसुली झाल्यास नागरिकांना दिल्या जाणार्‍या सेवा अधिक बळकट करता येतील व अधिक चांगल्या सुविधा देता येतील. त्यामुळे मालमत्ताधारकांनी नियमित कर भरावा. नवीन वर्षातील कराची बिले वितरीत करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. ज्यांना बिले मिळाली नाहीत, त्यांनी प्रभाग समिती कार्यालयात जाऊन आपले कराचे बिल
तपासून घ्यावे. एप्रिल महिन्यात संकलित करावर १० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन यशवंत डांगे यांनी केले आहे.

रस्त्यांच्या कामांसंदर्भात उच्चस्तरीय बैठक; खासदार निलेश लंके यांनी घेतला आढावा

नगर – अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघात निवडणूकीदरम्यान दिलेल्या विकास कामांची पुर्तता करण्यासाठी विविध भागांतील रस्ते आणि महामार्गांच्या कामांना गती देण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय बैठकीत खा. नीलेश लंके यांनी विविध
कामांचा आढावा घेतला. नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, तांत्रीक तज्ञ, अभियंते आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर-पुणे ग्रीन फिल्ड महामार्ग, सुरत-चेन्नई महामार्ग, पैठण पालखी मार्ग आणि इतर महत्वाच्या रस्ते प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात
आला. या प्रकल्पांमध्ये येणार्‍या अडचणी, निधी वितरण, विविध प्रकारच्या परवाणग्या, तांत्रीक बाबी आणि जमीनींचे अधिग्रहण याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
कामांमध्ये येणारे अडथळे दुर करून कामांना गती देण्यासाठी अधिकार्‍यांना खा. लंके
यांनी यावेळी ठोस सुचना दिल्या.
बैठकीस माजी नगरसेवक दीप चव्हाण, योगीराज गाडे, गिरीश जाधव, प्रकाश
पोटे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंधेकर, साईट
इंजिनिअर ओंकार देवकर, कार्यकारी अभियंता शेवाळे, सर्व्हेअर मुजीफ सययद,
महेश मिश्रा, निवासी अभियंता अलोक सिंग, शाखा अभियंता  शोएब फकीर, उपविभागीय
अभियंता अजित गायके, घटमल, राखाडे व इतर अधिकारी उपस्थित होते. महत्वाच्या
प्रकल्पांवर चर्चा राहुरी-बारगांव नांदूरय्जांभळी-वावरथ-भोकरदराय्ढवळपुरी हा नगर-कल्याण
महामार्गाला जोडणारा रस्ता, राहुरी येथे बायपास अथवा फ्लाय ओव्हर ब्रीज उभारणी,
नगर शहरातील पत्रकार चौक ते सह्याद्री चौकादरम्यान फ्लाय ओव्हर ब्रीज, आढळगांव
ता. श्रीगोंदा येथे रेल्वे ओव्हरब्रीज आदी महत्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात
आली. पैठण-मोहरी-खर्डा या ५५ कि. मी. लांबीच्या पालखी मार्गाचे काम वारकर्‍यांसह
शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्वाचे असल्याने हे काम गुणवत्तापुर्ण व वेळेत पुर्ण करण्याचे
निर्देश यावेळी खा. लंके यांनी दिले.
नियमित आढावा बैठक घेणार
काही प्रकल्पांमध्ये अडथळे येत असल्यास त्यासंदर्भात केंद्र सरकारकडे
पाठपुरावा करून ते दुर करण्यात येतील. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी
यांच्यासोबत स्वतंत्र बैठकीचे आयोजन करण्यात येईल. कामे दर्जेदार व वेळेत
होण्यासाठी नियमित आढावा बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला