नगर – सकल ब्राह्मण समाज सेवा संस्था अहिल्यानगरच्यावतीने २१ ते ६ एप्रिल या कालावधीत अहिल्यानगर ते वाशिम अशा
६ दिवसाच्या भार्गव दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सकल ब्राह्मण समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ पोतदार व विजय देशपांडे यांनी दिली. यात्रेत सहभागी होऊ इच्छिणार्या व्यक्तीस प्रत्येकी ४ हजार रुपये फी आकारण्यात येणार असून त्यामध्ये २द२ लझरी बसने प्रवास, निवास व्यवस्था, चहा, नाश्ता, २ वेळचे जेवण व पिण्याचे पाणी अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उपक्रमाबाबत ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. पवननगर येथील श्रीराम मंदिरात पत्रिका अर्पण करून त्यांनी या धार्मिक कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी राजाभाऊ पोतदार, विजय देशपांडे, डॉ. सागर बोरुडे, प्रशांत भालेराव, अतुल शुल्क, गणेश जोशी, ओंकार देशपांडे, हेमंत जोशी, रामनिवास पारीख, राजेंद्र कुलकर्णी, मनिषा कुलकर्णी, प्रज्ञा जोशी, अनिरुद्ध जोशी, सोनाली शुल्क, अभिजीत बल्लाळ, प्राजक्ता
भालेराव, प्रणाली जोशी, मंगेश जोशी, निखिल देवरे, निलेश भालेराव, सार्थक भोंग, श्रीगोपाल जोशी आदी उपस्थित होते.
२१ ते २६ एप्रिल या कालावधीत भार्गव दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेचे प्रस्थान २१ एप्रिल रोजी काळी ६ वाजता दिल्ली गेट अहिल्यानगर येथून होणार असून छत्रपती संभाजीनगर, जालना, देऊळगाव, राजा सिंदखेडराजा, मेहकर, वाशिम, औंढा नागनाथ, हिंगोली, पुसद, माहूर, डीग्रस, लाड कारंजा, मूर्तिजापूर, अकोला, खामगाव, मलकापूर, मुक्ताईनगर, ओंकारेश्वर, जानापाव, सेंधवा, शिरपूर, धुळे, मालेगाव, मनमाड, येवला, कोपरगाव, शिर्डी, राहता, राहुरी मार्गे २६ एप्रिल रोजी अहिल्यानगर येथील रेणुकामाता मंदिरात पोहोचणार आहे.
इच्छुक भाविक भक्तांनी माहितीसाठी राजाभाऊ पोतदार मो. ८८३००१८५५३, विजय देशपांडे मो. ९६२३४५५५९९, श्रिया देशमुख ८२७५४३८२०२, अतुल शुल मो. ९६८९५५८९७९, हेमंत जोशी मो. ९८२२८६६०५९, दत्तात्रय
कुलकर्णी मो. ९४०४२५०७३६, अनिल आवटी मो. ८४४६२२१४०२, केतन बडवे मो. ९५०३०३०३१७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सकल ब्राम्हण सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.